आज व उद्या ऑरेंज अलर्ट
नाशिक : प्रतिनिधी
भारतीय हवामान विभागाच्या (मुंबई वेधशाळा) पुढील पाच दिवसांच्या अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यासह नाशिक घाट परिसरात पुढील तीन दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता आहे. 30 आणि 31 जुलै रोजी नाशिक घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात
आला आहे.
30 आणि 31 जुलै रोजी नाशिक घाट परिसरात मुसळधार पावसासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. 1 ऑगस्ट रोजी नाशिक घाटासाठी यलो अलर्ट कायम असून, 2 ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यास कोणताही अलर्ट नाही.
नागरिकांनी विजांच्या कडकडाटाच्या वेळी उघड्यावर न थांबता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, नदी-नाले आणि धबधब्यांच्या परिसरात जाणे टाळावे तसेच प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Rain warning for Nashik and the Ghat regions for three days.