नाशिक

इगतपुरी परिसरात श्रावणात पावसाने पुन्हा धरला जोर

धरणांतून रोखलेला विसर्ग सुरू; ग्रामीण भागात रिपरिप सुरूच

इगतपुरी : प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यात गत महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने शेतीची कामे खोळंबली होती. धरणांच्या जलसाठ्यातही कमालीची वाढ झाल्याने भरमसाठ विसर्ग सुरू होता. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. दरम्यान, श्रावण महिना सुरू होताच इगतपुरी तालुक्यात जवळपास सर्वच भागांत पुन्हा नव्या जोमाने पावसाचे आगमन झाले. शुक्रवारी दिवसभर घोटी, इगतपुरी व ग्रामीण परिसरात पावसाची रिपरिप सुरू होती.
पुन्हा पाऊस सुरू झाल्याने वातावरणात कमालीचा गारवा निर्माण होऊन इगतपुरी, घोटी परिसरात धुके पसरले आहे. इगतपुरी, घोटी, वैतरणा, नांदगावसदो, भावली, काळुस्ते, त्रिंगलवाडी या परिसरात काल रात्रीपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. काही ठिकाणी अतिपावसाने रखडलेली शेतीची भातलागवडीची कामे पाऊस उघडीपच्या काळात जोमाने सुरू झाली होती, तर माळरानावर पाणी कमी असल्याने शेतीची कामे रखडली होती.

पावसासह धरणांतील विसर्ग

इगतपुरी तालुक्यात जवळपास सर्वच सातही मोठ्या धरण प्रकल्पांत जलसाठा ओव्हरफ्लोच्या अवस्थेत होता. या काळात सर्वच प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने धरणांमधून सुरू असलेला विसर्ग जलसंपदा विभागाने काहीसा रोखला होता. मात्र, आजपासून पुन्हा पावसाने जोर धरल्याने धरणांमधून विसर्ग सुरू होऊन त्यात काहीशी वाढ करण्यात आली आहे.

धरणांतील आजचा जलसाठा
(टक्केवारीत)

दारणा    83.86
मुकणे    84.22
वाकी     87.52
भाम      100
भावली   100
कडवा    91.53

आजपर्यंत इगतपुरी तालुक्यात एकूण पाऊस : 2317 मिमी
वार्षिक सरासरीच्या 68 टक्के पाऊस
धरणांच्या जलसाठ्यातून विसर्ग

दारणा   3952  क्यूसेक
भाम     1119    क्यूसेक
भावली  481    क्यूसेक
वाकी     566   क्यूसेक

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 hour ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 hour ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 hours ago