मॅरेथॉन बैठका घेत निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना
नाशिक : प्रतिनिधी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या तीन तासांच्या नाशिक दौर्यात मॅरेथॉन बैठका घेत पदाधिकार्यांना आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या. शहरातील पदाधिकार्यांच्या यादीसह प्रमुख पदाधिकार्यांना 30 जून रोजी मुंबईत पाचारण केले आहे.
राज ठाकरे यांनी दोन वेळा नाशिक दौरा रद्द केल्यानंतर काल सोमवार, दि. 26 रोजी नाशिक दौर्यावर आले. त्यांच्या दौर्याबाबत मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, ठाकरे यांनी तीन तासांत दौरा आटोपता घेतला. तीन तासांच्या दौर्यात शहर व जिल्ह्यातील कोअर कमिटी, विभाग अध्यक्ष, महिला पदधिकार्यांची बैठक घेतली.
यावेळी नाशिक रोड शिवजन्मोत्सव समितीच्या शिष्टमंडळासह इतर शिष्टमंडळांनी ठाकरे यांची भेट घेतली.अगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वमिवर सर्वच राजकीय पक्षांकडून तयारीला वेग आला आहे. नाशिक हा कधी काळी मनसेचा बालेकिल्ला होता. त्यामुळे ठाकरे यांचे नाशिकवर विशेष लक्ष असणार आहे. बैठकीत अगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अंतर्गत हेवेदावे विसरून तयारीला लागा, पक्षापासून दुरावलेल्या जोडण्याचा प्रयत्न करा, नागरिकांशी कनेक्ट वाढवा, मनसेत येण्यास उत्सुक असणार्याचा प्रवेश सोहळा घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
यावेळी प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्षक अंकुश पवार, शहराध्यक्षक सुदाम कोंबडे, महिला सेना प्रदेश उपाध्यक्ष सुजाता डेरे आदी उपस्थित होते.
शहरातील पदाधिकार्यांची यादी 30 मे रोजी मुंबईत प्रमुख पदाधिकार्यांच्या बैठकीत सादर करण्याच्या सूचनाही ठाकरे यांनी दिल्या आहेत. दरम्यान, राज ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौर्यावर होते. नाशिकवरून ते पुण्याला जाणार होते. मात्र, पुण्यात पाऊस असल्यामुळे ठाकरे यांनी पुणे दौराही रद्द करत मुंबईला जाणे पसंत केले.
ठाकरेंच्या हजरजबाबीपणाचे दर्शन
राज ठाकरे यांच्या आगमनानंतर कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले.
नाशिक रोड शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी एका कार्यकर्त्याने उत्साहाच्या भरात राज ठाकरे यांना टोपी घालण्याचा प्रयत्न केला.
मात्र, ठाकरे यांनी तत्काळ थांब, मला टोपी घालणार का?
असा मिश्कील सवाल केला. त्यानंतर एकच हशा झाला.
सत्कारानंतरही राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा कार्यकर्त्याला उदेशून
तुला काय टोप्या घालायच्या आहेत? असे म्हणाले.
त्यामुळे एकच हास्यकल्लोळ झाला.
मनसेत लवकरच प्रवेश सोहळा
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी
इतर पक्षांतील नाराजांवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहेत.
इतर पक्षांतून मनसेत येण्यास इच्छुक असणार्यांचा प्रवेश सोहळा
लवकरच मुंबईत राज ठाकरे यांच्या उपस्थित होणार आहे.
राज्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हनी ट्रॅप केंद्रबिंदू या शहरात शहापूर/ साजिद शेख गेल्याकाही दिवसांपासून विधीमंडळात एक-…
जव्हार( राजेवाडी )येथे गॅस्ट्रो साथीचे थैमान: दोन रुग्णांचा मृत्यू, 14 रुग्णांवर उपचार सुरू मोखाडा: …
आधी प्रेम... मग लिव्ह इन अन नंतर ... शहापूर/साजिद शेख २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला अश्लील…
दिंडोरी येथील अपघातात सात ठार अपघातात तीन महिला, तीन पुरुष एक बालकाचा समावेश दिंडोरी…
साखरपुडा एकाशी, लग्न त्याच्याच मित्राशी प्रेमात धोका, स्टेटस ठेवले अन् पुढे घडले... सद्या प्रेमाची व्याख्याच…
नाशिकरोड : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले असून,…