मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित होणारी हीरक महोत्सवी वर्षातील महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी यावर्षी कोल्हापूर येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे आयोजित होणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी केली.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दिनांक ६ मे रोजी १०० व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने व स्मृती शताब्दी वर्षानिमित्ताचे औचित्य साधून कोल्हापूर येथे या स्पर्धा घ्याव्यात अशी मागणी कोल्हापूरकरांनी केली होती. संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या स्मृतींना नुकतीच १०० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य व राजर्षी शाहू महाराज यांची स्मृतिशताब्दी या निमित्ताने कोल्हापूर मधील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे दिनांक ६ मे २०२२ पासून हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री देशमुख यांनी दिली.
यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या राज्य नाट्य स्पर्धेच्या १९ केंद्रांवरील प्राथमिक फेरीत ३५६ नाट्यसंस्थांनी सहभाग घेतला होता. यापैकी प्राथमिक फेरीतील ३४ नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आलेली आहे. हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत निवड झालेल्या संस्था, कलाकार व तंत्रज्ञ यांना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी प्रयोग सादरीकरणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…