महाविकास आघाडीला धक्का
मुंबई
संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या राज्यसभेच्या सहा जागांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला तीन तर भारतीय जनता पार्टीला तीन जागांवर विजय मिळाला, सहाव्या जागेवर भारतीय जनता पार्टीचे धनंजय महाडिक हे विजयी झाले, महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव झाला, या पराभवाने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे, मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर दोन्ही बाजुंनी आक्षेप घेण्यात आले होते, त्यात शिवसेनेचे सुहास कांदे यांचे मत केंद्रीय निवडणूक आयोगाने बाद ठरवले, या निवडणुकीत मतांची फाटाफूट झाली, महाविकास आघाडीची दहा मते फुटल्याचे उघड झाले या निवडणुकीत शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान
प्रतापगडी, भारतीय जनता पार्टीचे पीयूष गोयल, अनिल बॉंडे, धनंजय महाडिक हे विजयी झाले,
संजय पवार यांना पहिल्या पसंती ची 33 मते मिळाली तर महाडिक याना दुसऱ्या पसंतीची 44 मते मिळाल्याने त्यांचा विजय सोपा झाला,