नाशिक

मालेगावात 80 मीटर तिरंग्यासह रॅली

700 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; देशभक्तीचा जयघोष

मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव महापालिकेतर्फे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत गुरुवारी (दि. 13) शहरातून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. तब्बल 80 मीटर लांबीचा तिरंगा हातात घेऊन विद्यार्थी, मनपा अधिकारी व कर्मचार्‍यांनी सहभाग घेतल्याने शहरातील वातावरण देशभक्तीच्या जयघोषाने दुमदुमून गेले. विविध शाळांमधील सुमारे 700 विद्यार्थ्यांनी रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
महानगरपालिका मुख्यालय प्रवेशद्वारावर सकाळी 8.30 वाजता आयुक्त रवींद्र जाधव यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली. रॅलीच्या अग्रभागी शालेय विद्यार्थी, तर त्यांच्या मागे मनपा अधिकारी-कर्मचारी 80 मीटर लांबीचा तिरंगा हातात घेऊन सहभागी झाले होते. या भव्य तिरंग्यामुळे रॅलीचे दृश्य
लक्षवेधी ठरले.
येथील रु. झ. काकाणी कन्या विद्यालय, झु. प. काकाणी विद्यालय, मनपा उर्दू शाळा क्र. 1 व 34, ए.टी.टी. हायस्कूल, या. ना. जाधव विद्यालय आणि पी.ई.एस. स्कूलमधील विद्यार्थ्यांनी रॅलीत सहभाग घेतला. मनपा मुख्यालयातून सुरू झालेली रॅली रामसेतू कॉर्नर, गूळ बाजार, सरदार टॉकीज कॉर्नर, नंदन टॉवर, किदवाई रस्ता, संविधान चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, श्रीदत्त मंदिर चौक, महात्मा
फुले रस्ता, या. ना. जाधव विद्यालय, मोसमपूल, मोहन टॉकीज कॉर्नर, श्रीरामनगर मार्गे हुतात्मा स्मारक
येथे पोहोचली.
रॅलीदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले व महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांना आयुक्त रवींद्र जाधव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शहरातील विविध ठिकाणी नागरिकांनी रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत केले. देशभक्तीपर गीतांसह ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘इन्कलाब जिंदाबाद’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
रॅलीदरम्यान शहर वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक संजय पवार व त्यांच्या सहकार्‍यांनी वाहतुकीचे नियोजन केले. मनपाच्या अग्निशमन विभागाचे वाहन, रुग्णवाहिका तसेच पाणीपुरवठा विभागाचे वाहनही रॅलीत सहभागी झाले होते. हुतात्मा स्मारक येथे हुतात्मा स्तंभाला अभिवादन करून राष्ट्रगीत आणि ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने रॅलीची सांगता करण्यात आली. रॅलीस नगर सचिव साजीद अन्सारी, सहायक आयुक्त दिनेश मोरे, मुख्य अग्निशमन अधिकारी डॉ. संजय पवार, लेखाधिकारी हरीश डिंबर, संगणक विभागप्रमुख सचिन महाले, जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे, लेखापरीक्षक गणेश हळदे आदी उपस्थित होते.

Rally with 80 meter tricolor in Malegaon

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago