नाशिक

महसूल विभागातील 13 अधिकारी-कर्मचार्‍यांचा गौरव

उत्कृष्ट कामगिरीची दखल; नाशिक विभागीय आयुक्तांच्या समितीकडून निवड

नाशिक : प्रतिनिधी
महसूल विभागात उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी बजावणार्‍या नाशिक विभागातील 13 अधिकारी-कर्मचार्‍यांचा स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात 15 ऑगस्ट रोजी पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. महसूल दिनाच्या निमित्ताने देण्यात येणार्‍या या पुरस्कारांसाठी 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2026 या कालावधीत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या
निर्देशानुसार दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा केला जातो. महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावर उत्कृष्ट काम करणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांना त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल विभागनिहाय गौरविण्यात येते. याच प्रक्रियेंतर्गत नाशिक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने यंदाच्या पुरस्कारार्थींची निवड केली
आहे. समितीत सदस्य सचिव जितेंद्र वाघ, अपर आयुक्त (महसूल) अरविंद लोखंडे, अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) प्रशांत काळे, उपायुक्त (पुरवठा) हेमांगी पाटील अपर जिल्हाधिकारी यांचा समावेश होता.
समितीने विविध संवर्गातील अधिकारी-कर्मचार्‍यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन 13 जणांची पुरस्कारासाठी निवड केली.
पुरस्कारार्थींमध्ये अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, तहसीलदार विशाल सोनवणे, नायब तहसीलदार पूजा अवघडे, लघुलेखक नितीन पुंडलिक बागूल, सहायक महसूल अधिकारी दत्तात्रय अनिल गंधाडे, मंडळ अधिकारी सोनाली बाबूराव कोल्हे, महसूल सहायक गुणवंत पाटील, ग्राम महसूल अधिकारी महेंद्र प्रकाश शिंदे, वाहनचालक यशवंत वाघ, शिपाई सलीम रज्जाक शेख, महसूल सेवक डोंगर माळीच आणि पोलीसपाटील सुभाष निकुंभे यांचा समावेश आहे.
महसूल प्रशासनाच्या विविध स्तरांवर जबाबदारी पार पाडताना कार्यक्षमता, कर्तव्यनिष्ठा आणि उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल या अधिकारी-कर्मचार्‍यांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर या पुरस्कारांचे वितरण करून त्यांच्या कार्याचा गौरव केला जाणार आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या राष्ट्रीय सोहळ्यात मिळणारा हा सन्मान महसूल विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांसाठी विशेष अभिमानाचा ठरणार असून, त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन इतर कर्मचार्‍यांनाही प्रेरणा मिळणार आहे.

13 officers and employees of the Revenue Department felicitated.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago