रामनवमी उत्साहपूर्ण वातावरणात

नाशिक : प्रतिनिधी

राम जन्मला गं सखे राम जन्मला.. सीयावर रामचंद्र की जय… असा जयघोष करत शहरात काल रामनवमी उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर सर्व निर्बंध उठल्यानंतर झालेल्या रामनवमीचा भाविकांत मोठा उत्साह दिसून आला. शहरातील प्रसिद्ध काळाराम मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी दिसून आली.
काळाराम मंदिरात दुपारी बारा वाजता संस्थानचे विश्वस्त आणि हजारो नाशिककर नागरिकांच्या उपस्थितीत पाळणा हलवून राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. पहाटे काकड आरती करण्यात आली. महाभिषेक आणि पूजाविधी देवेंद्रबुवा पूजाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. दुपारी बाराला मंदिरातील मुख्य गाभार्‍यातील काळाराम यांच्या मूर्ती समोरील पडदा हटवून रामजन्म साजरा करण्यात आला. यावेळी हजारो रामभक्तांनी सियावर रामचंद्र की जय.. अशा घोषणा देत संपूर्ण मंदिर परिसर दणाणून सोडला.

गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

महिलांनी यावेळी पारंपरिक वेशभूषा करीत रामजन्माच्या गीतांवर नृत्याचा ठेका धरला होता. रामजन्मोत्सवामुळे संपूर्ण काळाराम मंदिराच्या प्रांगणात सुरेख रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्यामुळे रात्रीच्या वेळी मंदिराच्या परिसरात उजाळून निघाला होता. पंचवटी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला.रात्री अन्नकुटामध्ये भगवान रामचंद्रांना 56 पदार्थांचा नैवद्य (भोग) अर्पण करण्यात आला. काळारामाचे दर्शन घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत लांबच लांब रांगा लावल्या होत्या.संस्थानातर्फे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, पोलीस कर्मचार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

कोरोनाचे सावट हटले
मागील वर्षी कोरोनाचे सावट होते.त्यामुळे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला होता. यंदा सर्व निर्बंध दूर झाल्यामुळे भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी यंदा पाहावयास मिळाली.

हे ही वाचा

One thought on “रामनवमी उत्साहपूर्ण वातावरणात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *