उत्तर महाराष्ट्र

भाजपाला शिवसेना संपवायचीय, खा. संजय राउतांचा गंभीर आरोप

नाशिक महानगरपालिकेत शिवसेनेचा भगवा फडकणार
नाशिक : गोरख काळे
शिवसेनेतून बंडखोरी करणार्‍या आमदारांनी स्वत:च्या हिमतीवर निवडणूक लढवून दाखवावी. शिवसेनेवर कोणीही दावा सांगू शकत नसून शिवसेना व धनुष्यबाण ही आमचीच आहे. भाजपला शिवसेना फोडायची नसून ती संपवायची आहे. मात्र हे कधीही शक्य नाही. शिवसेना अधिक जोमाने उभी राहील. नाशिक महापालिकेत येणार्‍या निवडणुकीत शिवसेनेचाच भगवा फडकवेल. असा विश्‍वास शिवसेना खा. संजय राउत यांनी व्यक्त केला.
शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषेत ते बोलत होते, यावेळी संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी आ. वसंत गिते, योगेश घोलप, अनिल कदम, निर्मला गावित, माजी महापौर प्रथमेश गिते आदीसह मोठया संख्येने शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे राउत म्हणाले, ग्रामीण जिल्हयात काही बदल करायचे आहे. सध्या जो काही धुराळा उडाला आहे. हे कृत्रीम वादळ आहे. मात्र शिवसेना पुन्हा जिद्दीने उभी राहील. आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा काढली असून नाशिक जिल्हयात लवकर येणार आहे. सर्वजन याची वाट पाहत आहे. भाजपकडून आपल्यावर जे आरोप केले जायचे ते बंद झाले असून सध्या हे त्यांना चाळीस भोंगे मिळाले असल्याची टीका त्यांनी केली . बंडखोरी करणार्‍यांना आम्ही आजही आमचे सहकारीच मानतो. ही बंडखोरी झाली त्यावेळी पहीले कारण हिदूत्वाचे दिले, नंतर मुख्यमंत्रीच भेट नाही, तीसरे कारण उपमुख्यमंत्री अजित पवार निधी देत नसल्याचा सांगण्यात आले. आता कोणते कारण देतील सांगता येणार नाही. मात्र बंडखोरांनी त्यांची भूमिका जाहीर करावी. भाजपला शिवसेनेतच भांडने लाउन रक्तपात करायचा आहे. सध्यचे सरकार हेकायदेशीर असून राज्यापाल घटनेचे पालन करताना दिसत नाही. भाजपकडून झुंडशाही करत असल्याचा आरोप राउतांनी यावेळी केला. जनता जागृक असून ती सर्व नाटय पहात आहे.

भाजपला राज्याचे तीन तुकडे करायचे
महाराष्ट्रातून भाजपाला तीन तुकडे करायचे आहे. मुंबइ महाराष्ट्रापासून वेगळी करायची आहे. यासाठी ही सर्व फोडाफाडी झाली आहे. शिवसेनेमुळे हे शक्य नसल्याने शिवसेनेलाच संपवण्यासाठी भाजप काम करत आहे. त्यांचा एकच उद्देश असून तो म्हणजे शिवसेना संपवायची पण कदाची शक्य नसल्याचे त्यांनी म्हटले.
……
शहरातील पदाधिकारी कार्यकर्त्याचा मेळावा
शिवसेना कार्यालयात शहरातील सर्व नगरसेवक नसल्याने राउतांना याविषयी विचारले असता, आजचा दिवस हा ग्रामिण जिल्हयासाठी देण्यात आला होता. त्यामुळे शहरातील काही नगरसेवक आले नाही. अनेकांचे नियोजित कार्यक्रम होते. तसेच उद्या (दि.9) शनिवारी शहरातील सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ता यांचा मेळावा होणार आहे. तेव्हा तुम्ही बघा मेळाव्यासाठी सर्वजन उपस्थित राहतील.

Bhagwat Udavant

Recent Posts

गवंडगाव येथे आज चैत्र पाौर्णिमा यात्रोत्सवाचे आयोजन

गवंडगाव येथे चैत्र पाौर्णिमा यात्रोत्सवाचे आयोजन भाविकांनी यात्रात्सोवास येण्याचे  मनुदेवी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र वडनेरे यांचे…

2 hours ago

सातपूर हादरलं; अज्ञात हल्लेखोरांकडून तरुणाचा खून

सातपूर हादरलं; अज्ञात हल्लेखोरांकडून तरुणाचा खून   संशयित आरोपी फरार, पथकाकडून शोध   सातपूर: प्रतिनिधी…

4 hours ago

नाशिकरोड ‘एमपीए’च्या पदाधिकार्‍यांची निवड

नाशिकरोड : वार्ताहर युरेथ्रल स्ट्रिक्चर अत्याधुनिक पद्धतीने शस्रक्रिया कक्षींन आता सुरळीत करता येते. वारंवार यूरेथ्रा…

1 day ago

भव्य शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्रमांनी महावीर जयंती साजरी

नाशिकरोड : वार्ताहर जैन धर्माचे 24 वे तीर्थंकार भगवान महावीर यांचा 2624 जन्मकल्याणक म्हणजे जन्मदिन…

1 day ago

नैसर्गिक साधनांचा वापर करत विद्यार्थ्यांनी बनवली 140 घरटी

चिमण्यांसाठी केली दाणापाण्याची सोय, शहा येथील भैरवनाथ विद्यालयाचा पर्यावरणस्नेही उपक्रम सन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील शहा…

1 day ago

पोलीस ठाण्यातच  दोन पोलीस एकमेकांना भिडले नेमके काय कारण घडले?

पोलीस ठाण्यातच  दोन पोलीस एकमेकांना भिडले नेमके काय कारण घडले? सिडको :  विशेष प्रतिनिधी सरकार…

1 day ago