टोकियो : गोळीबारात गंभीर जखमी झालेले जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे उपचार सुरू असताना निधन झाले. शिंजो आबे यांच्यावर नारा शहरातील एका प्रचारसभेत ते बोलत असतानाच गोळीबाराची घटना घडली होती. त्यांच्या छातीत गोळी लागल्याने ते स्टेजवरच कोसळले होते. बेशुद्ध अवस्थेतच त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाल्याचे वृत्त जपानमधील एनएचके वर्ल्ड न्यूजने दिले होते. या प्रकरणी पोलिसांनी नारा शहरातील यामागामी तेत्सुयाला यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याजवळील बंदुकही जप्त करण्यात आली. नारा शहरात लिबरल डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवाराचा ते प्रचार करत होते. भाषण सुरू असतानाच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. शिंजो आबे यांच्यावरील हल्ल्याचा जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी तीव्र शब्दात निषेध केला.  घटनास्थळी असलेल्यांपैकी एका महिलेने सांगितले की, हल्लेखोराने दोन गोळ्या झाडल्या.पहिली गोळी लागताच ते खाली कोसळले. छातीत गोळी लागल्यामुळे त्यांना ह्दयविकाराचा धक्काही बसला.गोळी झाडल्यानंतर हल्लेखोर येथेच थांबून होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

14 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

14 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

14 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

14 hours ago