सटाणा : वार्ताहर
सटाणा शहरात पेट्रोलचे टँकर वेळेत पोहोचू शकत नसल्याने सर्वच पेट्रोल पंपावर पेट्रोलचा तुटवडा भासत आहे. तर काही पेट्रोल पंपावर पेट्रोल शिल्लक नसल्याचे फलक लावण्यात आले आहेत. सटाणा शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोलचा तुटवडा जाणवत असल्याने बहुतांशी पेट्रोल पंपावर पेट्रोलच शिल्लक नसल्याने ज्या पंपावर पेट्रोल शिल्लक आहे अशा ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. कडाक्याच्या उन्हात रांगेत उभे राहाण्याचा मनस्ताप वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. लग्न सराईचे दिवस असल्याने प्रत्येकाला पेट्रोलची नितांत गरज भासते. पेट्रोल तुटवड्यामुळे नागरीक हैराण झाले आहेत. पेट्रोल पंप चालकांना विचारले असता पेट्रोल डेपोतूनच टँकर वेळेवर पोहचत नसल्यामुळे पेट्रोल तुटवडा भासत आहे. त्याचा त्रास वाहन चालकांबरोबर पेट्रोल पंप चालकांना ही सहन करावा लागत आहे.
आपण या संधर्भात बातमी लावल्याबद्दल आपले धन्यवाद सटाणा शहराची लोकसंख्या पाहता फक्त आज मितीला 2 पंप चालु आहेत व हे रोजचे आहे खाजगी कंपनी मार्च पासून बंद आहे.आपल्या माध्यमातून लवकरच याबद्दल तोडगा निघावा v सतनेकरांची गैरसोय दूर व्हावी ही विनंती.