लसूण पावडर

लसूण पावडर

वर्तमानपत्राचे पान घेऊन एका मोठ्या ताटात ठेवा. त्यावर लसूण पाकळ्या अर्ध्या भागावर पसरवून ठेवा आणि वर्तमानपत्राच्या दुसर्‍या भागाची घडी त्यावर ठेवून वरून तलम कापड किंवा घडी घातलेल्या भागावर कागद उडणार नाही, अशा पद्धतीने हलके वजन ठेवून सावलीत वाळवून घ्यावे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने थोडा जास्त लसूण त्यावर ठेवलात तर चांगले. नंतर हा लसूण पूर्ण वाळलेला दिसल्यावर मिक्सरमध्ये घालून बारीक पावडर करून घ्यावी. दोन्ही खाली आणि वरील बाजूस कागद ठेवल्याने लसूण काळा पडणार नाही त्यामुळे पांढरी शुभ्र पावडर तयार होईल. ही पावडर अनेक पदार्थ बनवताना प्रत्यक्ष लसूण वापरण्याऐवजी वापरता येते. याच पद्धतीने कांद्याच्या पातळ उभ्या स्लाईस वाळवून त्याची पावडर देखील पदार्थ बनवताना वापरता येते.

उन्हाळा स्पेशल कोकोनट शेक

हिरवी मेथी पाने, कढीपत्ता, हिरवी कोथिंबीर, देठ काढलेल्या हिरव्या मिरच्यांचे तुकडे, देठ काढलेल्या लाल ओल्या मिरच्या वाळवून घ्या.
हिरवी मेथी, हिरवी कोथिंबीर व लाल वाळवलेल्या मिरच्या व वाळवलेल्या हिरव्या मिरच्या हाताने किंवा लाटण्याने क्रश करून सर्व पदार्थ वेगवेगळ्या एअर टाईट कंटेनर किंवा झीप लॉकच्या पिशव्यांमध्ये साठवून ठेवा.
लाल ढोबळी मिरची मिळाल्यास त्याचा वरचा आणि खालचा भाग काढून तुकडे करून बिया काढून टाकाव्यात आणि हे तुकडे वाळवून पावडर बनवतात, तुम्ही बर्‍याच रेसिपीजमध्ये पॅप्रिका पावडर हा शब्द ऐकला असेल तो हाच पदार्थ असतो. याने पदार्थ तिखट न बनता आवश्यक तो लाल रंग पदार्थाला येतो. याने तुमचा स्वयंपाकाचा वेळ वाचू शकतो आणि वाळलेली हिरवी मेथी पाने कसुरी मेथी म्हणून ओळखली जाते.
वरील पदार्थ दोन ते तीन दिवसांत सावलीत ्कडकडीत वाळतात व त्यांचा मूळ रंग व चव बदलत नाही .

One thought on “लसूण पावडर

  1. Pingback: - Gavkari News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *