महाराष्ट्र

‘समाजकार्य’ला स्वतंत्र विद्याशाखेची मान्यता

मंत्रिमंडळाचा निर्णय : शिक्षण, ऊर्जा क्षेत्राला चालना

मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विविध विभागांचे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्याच्या विकासाला गती देणार्‍या या निर्णयांमध्ये उच्च व तंत्रशिक्षण, विधी व न्याय, महसूल, सहकार आणि कृषी या क्षेत्रांचा प्रामुख्याने समावेश आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये समाजकार्य या विषयाला स्वतंत्र विद्याशाखा म्हणून मान्यता दिली असून, आता तिथे नवीन अभ्यासक्रम आणि अतिरिक्त तुकड्या सुरू करता येतील. समाजकार्य महाविद्यालयांना कायम विनाअनुदान तत्त्वावर हे नवीन अभ्यासक्रम राबवता येणार
आहेत.
राज्याच्या महसूल आणि ऊर्जा क्षेत्रातही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना चालना देण्यासाठी या प्रकल्पांसाठी खरेदी करण्यात आलेल्या जमिनीच्या हस्तांतरण शुल्कात 25 टक्क्यांची सवलत देण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. याशिवाय, अशा प्रकल्पांसाठी स्थापन करण्यात येणार्‍या कंपन्यांमधील अंतर्गत जमीन हस्तांतरण व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे. भूसंपादनाच्याबाबतीतही एक महत्त्वाचा निर्णय घेत, मोबदला देण्यास विलंब झाल्यास त्यावर देण्यात येणार्‍या व्याजदरात सुधारणा करण्यात आली आहे. भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्संस्थापना करताना रास्त भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 च्या कलम 72 मध्ये आवश्यक सुधारणा करण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

कृषी आणि सहकार क्षेत्राला बळ

कृषी आणि सहकार क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठीही राज्य सरकारने सकारात्मक पावले उचलली आहेत. लातूर जिल्ह्यातील किल्लारी (ता. औसा) येथील श्री नीळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय सहकार विकास निगम(एनसीडीसी)कडून भांडवली खर्च आणि खेळत्या भांडवलासाठी 18,00,09,000 रुपयांचे कर्ज घेण्यास सहकार व पणन विभागाने मंजुरी दिली आहे. कृषी विभागातही संरचनात्मक बदल करण्यात आले असून, कृषी संचालक आणि सहसंचालकांसह एकूण चार नवीन पदांच्या निर्मितीस मान्यता देण्यात आली आहे.

Recognition of ‘Social Work’ as an independent academic discipline

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

24 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

24 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

24 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

24 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

24 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago