कांद्याच्या ढिगार्यात कांदा उत्पादक शेतकर्यांचे स्वप्न चिरडले
लासलगाव : वार्ताहर
नाशिक जिल्ह्यातील 2024-25 या हंगामात उन्हाळी कांद्याचे उत्पादन तब्बल 63 टक्क्यांनी वाढ होऊन सुमारे 59 लाख टनांवर पोहोचले आहे. मागील हंगामात (2023-24) हे उत्पादन 36 लाख टन होते. ही वाढ मुख्यतः लागवडीखालील क्षेत्रात वाढ आणि अनुकूल हवामानामुळे झाल्याचे राज्य कृषी विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
या हंगामात 2.5 लाख हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड झाली असून, प्रतिहेक्टर सरासरी 23.4 टन उत्पादन नोंदवले गेले. मे महिन्यातील अवकाळी पावसामुळे सुमारे 10 टक्क्यांपर्यंत नुकसान झाले असले, तरीही हंगाम भरघोस राहिल्याने ऑक्टोबरपर्यंत पुरेसा पुरवठा उपलब्ध राहणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
उन्हाळी कांद्याचे वैशिष्ट्य म्हणजे, त्याची टिकाऊ गुणवत्ता ही 6 ते 7 महिने साठवून ठेवता येते. जी शेतकर्यांना बाजारात योग्य भाव मिळेपर्यंत थांबून विक्री करता येते. सध्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचा घाऊक दर प्रतिक्विंटल 1600 रुपये आहे. जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 1500 रुपयांपेक्षा थोडा जास्त आहे. मात्र, उत्पादन खर्च आणि बाजारभावातील तफावत शेतकर्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
उत्पादन खर्च हा प्रतिक्विंटल सुमारे 1800 रुपये आहे, पण गेल्या काही महिन्यांत शेतकर्यांना 1050 ते 1600 रुपयांदरम्यानच दर मिळाला आहे. त्यामुळे सरसकट तोटा सहन करावा लागतो आहे. इतक्या मेहनतीने पिकवलेला कांदा उत्पादक खर्चापेक्षा कमी दराने विकावा लागत आहे. उन्हाळी कांद्याच्या विक्रमी उत्पादनामुळे जरी पुरवठा शाश्वत राहणार असला, तरी योग्य दर मिळत नसल्याने केंद्राने कांदा निर्यातवाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. -भारत दिघोळे अध्यक्ष, महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटना
उत्पादन खर्च हा प्रतिक्विंटल सुमारे 1800 रुपये आहे, पण गेल्या काही महिन्यांत शेतकर्यांना 1050 ते 1600 रुपयांदरम्यानच दर मिळाला आहे. त्यामुळे सरसकट तोटा सहन करावा लागतो आहे. इतक्या मेहनतीने पिकवलेला कांदा उत्पादक खर्चापेक्षा कमी दराने विकावा लागत आहे. उन्हाळी कांद्याच्या विक्रमी उत्पादनामुळे जरी पुरवठा शाश्वत राहणार असला, तरी योग्य दर मिळत नसल्याने केंद्राने कांदा निर्यातवाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
-भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटना
पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…
देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…
गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…
बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…
वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…