आवकेत वाढ झाल्याचा परिणाम; सरासरी केवळ 1200 रुपये भाव
लासलगाव : वार्ताहर
आशिया खंडातील कांद्याची सर्वार्ंत मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीसह जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये नवीन लाल कांद्याची विक्रमी आवक येत असल्यामुळे कांद्याच्या बाजारभावात घसरण सुरू झाल्याने कांदा उत्पादक शेतकर्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. रोज लाल कांद्याची विक्रमी आवक होत आहे. परिणामी, लाल कांद्याच्या बाजारभावात घसरण होऊन कांद्याची लाली उतरली.
डिसेंबरअखेरीस ज्या नवीन लाल कांद्याला सरासरी 2,000 ते 2200 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळत होता, त्याच कांद्याचे दर अवघ्या काही दिवसांत 1,200 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत घसरले आहेत. त्यामुळे लासलगावसह संपूर्ण राज्यात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडल्याचे चित्र दिसत आहे. मिळालेल्या बाजारभावातून उत्पादन खर्चही वसूल होणार नसल्याचे शेतकरी बोलत आहेत. लाल कांद्याची साठवण क्षमता फार कमी असते. त्यामुळे काढणीनंतर लागलीच शेतकरी कांदा बाजार समितीत विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील तसेच अहिल्यानगर, पुणे, चाकण यासह देशांतर्गत असलेल्या बाजार समित्यांमध्येदेखील मागणीच्या तुलनेत नव्याने येत असलेल्या लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात दाखल होत असल्यामुळे लाल कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे. शुक्रवारी लासलगाव बाजार समितीत नवीन लाल कांद्याची अंदाजे 28 हजार क्विंटल आवक होऊन त्या कांद्यास किमान 400 रुपये, कमाल 1520 रुपये, तर सरासरी 1200 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाले.
कांद्याचा उत्पादन खर्च यंदा 15 टक्क्यांनी वाढला.त्यात एकरी उत्पादन निम्म्यावर आले आहे. सध्या मिळणार्या दरामुळे उत्पादन खर्चदेखील वसूल होत नसल्याची स्थिती आहे. सरकारचे अस्थिर निर्यात धोरण, यापूर्वी सातत्याने केलेला हस्तक्षेप यामुळे शेतकर्यांची आर्थिक कोंडी होत आहे.
-सचिन होळकर,
कृषितज्ज्ञ, लासलगाव
Red onion ‘Lali’ arrives in the onion city
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…