आहेरगाव, पाचोरेवणी, खेडलेझुंगे येथील शेतकर्यांचा निवेदनाद्वारे इशारा
निफाड : तालुका प्रतिनिधी
सरकारने मोठा गाजावाजा करून सुरू केलेली शिव पाणंद रस्ते मोकळे करण्याची मोहीम गावापर्यंत पोहोचलीच नसल्याने आम्हाला शेतात जाण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. नकाशावर असणारे शिव पाणंद रस्ते तात्काळ मोकळे करून द्यावेत, अन्यथा निफाड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा पाचोरे वणी, आहेरगाव, खेडलेझुंगे येथील शेतकर्यांनी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे
दिला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शिवरस्ते आणि पांदण रस्ते नसल्यामुळे आम्हाला अडचणींचा सामना करावा लागत आहे.
त्यासाठी प्रशासकीय अधिकार्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनदेखील प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही, त्यामुळे रस्त्याअभावी शेतीमशागतीची कामे करण्यास अडचणी येत आहेत. शेतात खते, बियाणे आणि मजूर वर्ग नेण्यासाठी अडचणी येत आहेत, पिकांची कापणी आणि शेतमाल बाहेर काढण्यासाठी कसरत करावी लागत आहे, रस्ते मोकळे करण्याबाबत शासनस्तरावरून मोठा गाजावाजा करण्यात येत आहे. मात्र, आम्ही मागणी करूनदेखील जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नकाशावरील रस्ते तत्काळ मोकळे करावे, अन्यथा रस्ते मोकळे होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा देण्यात आला. या निवेदनावर प्रसाद घोटेकर, शैला वाटपाडे, ज्योती वाटपाडे, अलका घुगे यांच्यासह शेतकर्यांच्या सह्या आहेत. या निवेदनाच्या प्रती महसूलमंत्री, मुख्यमंत्री यांनादेखील पाठविल्याचे शेतकर्यांनी सांगितले.
आहेरगाव-वडनेरभैरव या पाणंद रस्त्याची भूमी अभिलेख आणि महसूल विभागाने संयुक्त मोजणी करून हा रस्ता मोकळा करून आम्हाला न्याय द्यावा. तसेच आहेरगाव, पाचोरेवणी या रस्त्याचीदेखील मोजणी करून तो शेतमाल वाहतुकीसाठी योग्य करून द्यावा, अन्यथा आम्हाला याबाबत आमरण उपोषण करावे लागेल. अशाावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील.
-शैला वाटपाडे, शेतकरी,
पाचोरे वणी
Release the prisoners; otherwise, go on a hunger strike.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…