नाशिक

जिल्ह्यात दमदार पावसाचा दिलासा; टँकरची संख्या 207 वरून 134 वर

टँकरच्या फेर्‍याही 445 वरून 268 पर्यंत घटल्या

नाशिक : प्रतिनिधी
दि. 7 व 8 जुलै रोजी झालेल्या दमदार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी होण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी जिल्ह्यात टँकरद्वारे करण्यात येणार्‍या पाणीपुरवठ्यात मोठी घट झाली आहे. अनेक गावांनी टँकरमुक्तीचा दिलासा अनुभवला आहे.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या आकडेवारीनुसार, 1 जुलै 2026 रोजी जिल्ह्यातील 188 गावे व 523 वाड्या-पाडे, अशा एकूण 711 ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. यासाठी 207 खासगी टँकर कार्यरत असून, दररोज 445 फेर्‍या मारल्या जात होत्या. या माध्यमातून 3 लाख 57 हजार 319 नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविण्यात येत होते. 10 जुलै 2026 रोजीची परिस्थिती लक्षणीयरीत्या बदलली आहे.
टँकरवर अवलंबून असलेल्या गावांची संख्या 125, तर वाड्यांची संख्या 415 झाली असून, एकूण 540 ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. टँकरची संख्या 207 वरून 134 वर आली आहे. दररोजच्या फेर्‍याही 445 वरून 268 इतक्या कमी झाल्या आहेत. यामुळे टँकरद्वारे पाणी मिळणार्‍या नागरिकांची संख्या तीन लाख 57 हजार 319 वरून दोन लाख 47 हजार 519 इतकी कमी झाली आहे.
विशेष म्हणजे, दिंडोरी, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, कळवण आणि निफाड या तालुक्यांमध्ये टँकरची गरज पूर्णपणे संपुष्टात आली आहे. मालेगाव, सिन्नर, येवला आणि नांदगाव तालुक्यांमध्येही टँकरची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. काही भागांत अद्याप पाणीटंचाई कायम असल्याने तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे.
जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे विहिरी, कूपनलिका आणि स्थानिक जलस्रोतांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे टँकरवरील अवलंबित्व कमी होत आहे. आगामी काळात पावसाची अशीच साथ कायम राहिल्यास आणखी अनेक गावे टँकरमुक्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अशी आहे आकडेवारी

1 जुलै :                   711 ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा
10 जुलै :                540 ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा
टँकर संख्या :          207 वरून 134
दररोजच्या फेर्‍या :  445 वरून 268
लाभार्थी नागरिक : 3,57,319 वरून 2,47,519
7 व 8 जुलैच्या पावसामुळे अनेक गावे टँकरमुक्त

Relief from heavy rainfall in the district; number of tankers drops from 207 to 134.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

20 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

20 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

20 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

21 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

21 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

21 hours ago