नाशिकरोडजवळ रेल्वेचे डबे घसरले

नाशिकरोडजवळ रेल्वेचे डबे घसरले

 

नाशिक : प्रतिनिधी

नाशिकरोड येथून जवळच असलेल्या लहवितजवळ पवन एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले. या रेल्वे अपघातात काही प्रवाशी जखमी झाल्याचे वृत्त असून, वेळेत मदत न मिळाल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. रेल्वे पोलीस आणि आरपीएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून, तातडीने मदतयंत्रणा राबविली जात आहे. लोकमान्य टिळक जयनगर एक्स्प्रेसचे डबे रेल्वे रुळावरुन घसरल्याचे समजताच सर्वत्र खळबळ उडाली आहे. रेल्वेने तातडीने यंत्रणा राबविली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *