मोरदर रस्त्यावरील रहिवाशांची मागणी
मालेगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील वडेल येथील मोरदर रस्त्यावरील घरासमोर असलेल्या विद्युत रोहित्रामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन घरात राहावे लागत आहे. दरम्यान, पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे वीजप्रवाह उतरून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
घराजवळ धोकादायक असलेले रोहित्र हटवण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार करूनदेखील संबंधित विभाग कानाडोळा करत असल्याचा आरोप अशोक महाले यांनी केला आहे. या रोहित्रामुळे लहान मुलांच्या खेळण्यावर बंधने आली आहेत. लहान मुले खेळत असताना रोहित्राचा स्पर्श होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. रोहित्रामुळे वीजतारा लोंबकळत असून, घर्षण होऊन ठिणग्या पडतात.
महावितरण कंपनीच्या या भोंगळ कारभारामुळे जीवितहानी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे महावितरण कंपनीने रोहित्र सुरक्षित स्थळी हलविणे गरजेचे आहे. दुर्घटना घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा दुर्घटना घडण्याआधीच कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.
अनेक दिवसांपासून या रोहित्राचा पत्रव्यवहार करूनदेखील विषय मार्गी लागत नाही. संबंधित यंत्रणेकडून त्याची दखलच घेतली जात नाही. त्यामुळे मोठ्यांसह बालकांचा जीव गेल्यास संबंधित विभाग जबाबदार राहील.
-अशोक महाले, ग्रामस्थ, वडेल
दिंडोरी येथील अपघातात सात ठार अपघातात तीन महिला, तीन पुरुष एक बालकाचा समावेश दिंडोरी…
साखरपुडा एकाशी, लग्न त्याच्याच मित्राशी प्रेमात धोका, स्टेटस ठेवले अन् पुढे घडले... सद्या प्रेमाची व्याख्याच…
नाशिकरोड : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले असून,…
शहापूर: साजिद शेख पन्नास हजार रुपये दिल्यास त्याचे पाच लाख रुपये करुन देतो असे सांगून दोन…
फेसबुक तरुणीच्या बोलण्याला भाळला अन दोन कोटी गमावून बसला शहापूर : साजिद शेख एका…
अलिशान वाहनातून गुटख्याची तस्करी करणारा गजाआड दोघांवर गुन्हा, 11 लाख रुपयांचा ऐवज वाहनासह जप्त दिंडोरी…