पावसाळी नियोजनासह अतिक्रमणे काढा

द्वारका परिसरातील कामाचा आ. फरांदेंनी घेतला आढावा

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील अत्यंत वर्दळीच्या समजल्या जाणार्‍या द्वारका परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या अंडरपासच्या कामाचा आमदार देवयानी फरांदे यांनी बुधवारी, दि. 17 आढावा घेतला. आगामी पावसाळा आणि कुंभमेळा लक्षात घेता, हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी एमएसआयडीसीसह महापालिका प्रशासनाला दिल्या.
आमदार फरांदे यांनी पावसाळ्याचे नियोजन करण्यावर विशेष भर दिला. पावसात द्वारका परिसरात पाणी साचू नये, यासाठी पाण्याचा निचरा होईल अशा ठोस उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देश दिले. तसेच काठेगल्ली ते भाभानगर या परिसरात सुरू असलेल्या कामाला गती देण्यासह भाभानगर भागातील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी रस्ता रुंदीकरणाबाबतही त्यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या.
याशिवाय जुने नाशिककडे जाणार्‍या रस्त्यावरील इलेक्ट्रिकल केबल्स मागे सरकवून रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले. दौर्‍यात महापालिका आयुक्त मनीषा खत्री, शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Remove encroachments alongside monsoon planning.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *