रिपब्लिकन सेनेचे ‘हर घर संविधान’

जयंतीनिमित्त 1135 संविधान पुस्तिकांचे वाटप

नाशिक : प्रतिनिधी
रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रभर घर घर संविधान, हर घर संविधान उपक्रम राबवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यावर नाही तर डोक्यात घेतले पाहिजे. जीवन जगताना आपल्याला आपले मूलभूत हक्क माहिती असावेे, यासाठी राज्यातील प्रत्येक घरात डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान पोहोचले पाहिजे. याकरिताच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त 1135 संविधान पुस्तिकांचे व 135 किलो लाडू वाटप केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे
यांनी दिली.
महामानव आणि घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीचे औचित्य साधून बॅनर, फटाक्यांच्या आतषबाजीवर पैसा खर्च न करता त्याचा वापर वाचन संस्कृतीसाठी व्हावा, या उद्देशाने रिपब्लिकन सेनेने अगदी सामान्य नागरिकांपासून ते पोलिस प्रशासनासह इतर आस्थापनेत संविधनाच्या प्रतचे वाटप केले. नाशिक महानगर तसेच जिल्ह्यात ठिकठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम रिपब्लिकन सेनेकडून राबविण्यात आले. आंबेडकरी विचारांचे लोक हा दिवस एकप्रकारे सण म्हणून साजरा करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील तळागाळातील लोक, वंचित घटकांच्या कल्याणासाठी संपूर्ण आयुष्य वेचले. ‘संघटित व्हा, शिका आणि संघर्ष करा’ या त्यांच्या प्रेरणादायी विचारांची कास धरल्यानेच दलित आणि वंचित घटकांचे लोक विविध क्षेत्रांत आज छाप पाडत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार आम्ही कदापि विसरणार नाही, असेही शिंदे यांनी पुढे नमूद केले. भारताची राज्यघटना लिहिण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान मोलाचे राहिले. त्यांनी भारतीय संविधान तयार करण्यात प्रमुख भूमिका बजावली. समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय यांसारखी मूल्ये त्यांनी संविधानात समाविष्ट केली व मूलभूत अधिकारांची तरतूद त्यांनी केली. त्यांच्या या कार्याची आठवण कायम राहावी यासाठीच रिपब्लिकन सेनेतर्फे 1135 संविधान पुस्तिकांचे वाटप करण्यात आल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी रिपब्लिकन सेनेचे युवक जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, प्रभुदास इंगळे, गणेश मोरे अवसरमल व नाशिक जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

कष्टकरी, वंचित, शेतकरी, कामगार आदींसह सर्वच घटकांना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय मिळवून दिला. माणसाला माणूस म्हणून वागणूक त्यांच्यामुळे मिळू लागली. त्यांच्या जयंतीदिनी इतर खर्च न करता घराघरांत संविधान गेले पाहिजे, याकरिता पक्षाचे अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशान्वये कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांनी शहर, जिल्ह्यात संविधानाचे वाटप केले. – डॉ. अविनाश शिंदे, जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन सेना, नाशिक

 

Republican Army’s ‘Har Ghar Samvidhan’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *