नाशिक

चांदवडमध्ये 1000 वृक्षलागवडीचा संकल्प

मंत्री महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम

चांदवड : वार्ताहर
शहर अधिक सुंदर, स्वच्छ आणि हिरवेगार करण्याच्या उद्देशाने चांदवड शहरात पर्यावरण संवर्धनाचा मोठा संदेश देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “एक पेड माँ के नाम“ या प्रेरणादायी संकल्पनेला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हरित महाराष्ट्र संकल्पनेला पुढे नेत, गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरात तब्बल 1000 वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आला आहे.
या महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रमास आजपासून उत्साहात सुरुवात करण्यात आली. पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये संपूर्ण चांदवड शहरात ही वृक्ष लागवड मोहीम व्यापक पातळीवर राबविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. “एक पेड माँ के नाम… एक पेड चांदवड के नाम…” या संदेशातून हरित आणि पर्यावरणपूरक चांदवड घडविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

नगरपरिषदेचा पुढाकार

या मोहिमेचे नेटके नियोजन करण्यासाठी शहरातील विविध प्रभागांतील नगरसेवकांकडे प्रत्येकी 50 रोपे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच लागवड सुलभ व्हावी म्हणून यंत्राच्या माध्यमातून खड्ड्यांची व्यवस्था करण्यात आली. विशेष म्हणजे, चांदवड नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागांतर्गत तयार केलेले सेंद्रिय खत या वृक्ष लागवडीसाठी वापरण्यात येत असून, वृक्षांना खत व पाण्याची सोयही नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. केवळ वृक्षलागवड करून न थांबता, लागवड केलेल्या वृक्षांची देखभाल आणि संवर्धनाची संपूर्ण जबाबदारी नगरपरिषदेने घेतली असून, कर्मचारी व अधिकारी वर्गानेही यात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

विविध मान्यवरांची उपस्थिती

भूषण कासलीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. याप्रसंगी महेंद्र गांधीमुथा, संभाजी गुंजाळ, प्रसाद सोनवणे, संतोष भालेराव, प्रसाद प्रजापत, आकाश बडोदे, किरण वाघ, रामभाऊ जाधव, मनोहर मोरे, सुनील मोरे, मनोज बांगरे, नितीन अग्रवाल तसेच मुख्याधिकारी दिनेश सिनारे, बांधकाम अभियंता धनंजय क्षीरसागर, स्वच्छता अधिकारी विजय सोनवणे यांच्यासह शहरातील नागरिक, महिला व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकसहभागातून चळवळ

या पर्यावरणपूरक उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांनी सहभाग नोंदवून या मोहिमेचे लोकचळवळीत रूपांतर केले. “एक वृक्ष लावूया… “ या संदेशातून पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले.

Resolution to plant 1000 trees in Chandwad

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

19 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

19 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

20 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

20 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

20 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

20 hours ago