नाशिक

मालेगावात घटसर्पामुळे दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू

22 वर्षांनंतर महापालिका क्षेत्रात रुग्ण; आरोग्य यंत्रणा सतर्क

मालेगाव : प्रतिनिधी
शहरातील सायने बुद्रुक शिवारातील चाळीसगाव फाटा परिसरातील स्थलांतरित वस्तीमध्ये घटसर्प (डिप्थेरिया) या संसर्गजन्य आजाराने दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. काबील सुनील मदारी (वय 5) व सावंत सुनील मदारी (वय 1) अशी मृत बालकांची नावे आहेत. 22 वर्षांनंतर महापालिका क्षेत्रात घटसर्पचे रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काबील मदारी याला दोन दिवसांपासून ताप होता. त्यास श्वास घेण्यास त्रास होत असल्याने शुक्रवारी (दि. 15) सायंकाळी मालेगाव सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्या गळ्याला सूज आली होती, नाकातून रक्तस्राव होत होता तसेच झटकेही येत होते. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. गळ्यात पापुद्रा तयार झाल्याने श्वसननलिका टाकण्यात अडचणी येत होत्या. कृत्रिम श्वासोच्छ्वासासाठी त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. सर्वतोपरी उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, काबीलचा धाकटा भाऊ सावंत मदारी (वय 1) याचाही गुरुवारी (दि. 14) अशाच लक्षणांमुळे मृत्यू झाला होता. दुसर्‍या भावाच्या मृत्यूनंतर हा प्रकार उघडकीस आल्याने आरोग्य विभागाची धावपळ उडाली.
मदारी कुटुंब मूळचे राजस्थानातील अजमेर येथील आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते सायने बुद्रुक शिवारातील भटक्या वस्तीत वास्तव्यास आहेत. मजुरी व भीक मागून उदरनिर्वाह करणारे हे कुटुंब नागरी सुविधा व आरोग्यविषयक बाबींविषयी अनभिज्ञ असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
दरम्यान, आरोग्य विभागाने संबंधित परिसरात संशयित रुग्ण शोधमोहीम सुरू केली आहे. तातडीने लसीकरण अभियान हाती घेण्यात आले आहे. मृत बालकांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना प्रतिबंधात्मक औषधोपचार देण्यात आले आहेत. सात वर्षांखालील मुलांना पेंटाव्हॅलेंट व डीपीटी लस, तर मोठ्या मुलांना, पालकांना व तरुणांना टीडी लस देण्यात येत आहे. आरोग्य विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

घटसर्प आजाराची लक्षणे

घटसर्प हा घसा व नाकातील श्लेष्मल त्वचेवर परिणाम करणारा अत्यंत संसर्गजन्य आजार आहे. संसर्ग झाल्यानंतर दोन ते पाच दिवसांत लक्षणे दिसू लागतात. घशात करड्या रंगाचा थर तयार होणे, घसा दुखणे, गिळताना त्रास होणे, मानेला सूज येणे, श्वास घेण्यास त्रास व ताप ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत. गंभीर अवस्थेत हा आजार जीवघेणाही ठरू शकतो.

Two siblings die of typhoid fever in Malegaon

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

20 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

20 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

20 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

20 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

21 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

21 hours ago