नाशिक : प्रतिनिधी
शहरातील मालमत्ता कराची कोट्यवधीची थकबाकी वसुलीकरिता महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी महासभेत अभय योजनेला पुन्हा चाल दिली होती. विशेषत: जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर शास्तीवर 95 टक्के सूट देण्यात आली होती. 23 फेब्रुवारीपासून सुरू झालेली ही योजना सोमवारी (दि. 9 मार्च) संपुष्टात आली. दरम्यान, पंधरा दिवसांत 13 हजार 516 मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घेतला. या कालावधीत 28 कोटी 63 लाखांचा भरणा झाला.
आर्थिक वर्षाच्या अखेरीस थकबाकी वसुलीला गती देण्यासाठी महापालिकेकडून पुन्हा अभय योजनेची घोषणा केली होती. यासाठी थकीत कराच्या शास्तीवर थेट 95 टक्के सूट देण्यात आली. प्रारंभी ही योजना 5 मार्चपर्यंत होती. पण प्रशासनाने सदर योजनेला आणखी चार दिवसांची मुदतवाढ दिली. वसुलीत पंचवटी विभाग आघाडीवर असून, पंधरा दिवसांत सहा कोटी 92 लाख रुपयांहून अधिक कर मिळकतदारांनी भरला. त्यापाठोपाठ नवीन नाशिक आणि नाशिक पूर्व विभागाचा क्रमांक लागतो. कर विभागाला 2025-26 या आर्थिक वर्षात तब्बल तीनशे कोटीचे उद्दिष्ट दिले आहे. हा कर 31 मार्चपर्यत वसूल करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. दरम्यान, सूट देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणार्यांवर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.
विभागनिहाय माहिती
विभाग वसुलीची रक्कम लाभार्थी संख्या
नवीन नाशिक 527.78 लाख 2,897
नाशिक पूर्व 509.98 लाख 1,907
नाशिक पश्चिम 486.58 लाख 1,206
नाशिकरोड 367.85 लाख 2,139
सातपूर 278.21 लाख 1,556
बड्या थकबाकीदारांनी त्यांच्याकडील थकीत रक्कम भरून प्रशासनाला सहकार्य करावे. अन्यथा त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल.
– अजित निकत, उपायुक्त, कर विभाग, मनपा
Response to Abhay scheme; 28 crores deposited
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…