नाशिक

रिंगरोडबाधितांनी मांडले अधिकार्‍यांकडे गार्‍हाणे

अन्याय होऊ देणार नाही : आ. सरोज अहिरे

नाशिकरोड : वार्ताहर
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिक शहराभोवती 66 किलोमीटरचा रिंगरोड उभारला जाणार आहे. त्यात कुणावरही अन्याय होणार नाही. ज्यांची शेती त्यातील पिके, घरदार, फळझाडे याची सविस्तर माहिती घेऊन त्यांना योग्य तो मोबदला दिला जाईल. ग्रीनझोन व यलो बेल्ट यातील मोबदल्यातील तफावत आणि रेडीरेकनरमधील दर यासंबंधीच्या तक्रारी व इतरही बाबींच्या तक्रारी मी थेट मुख्यमंत्र्यांकडे व स्थानिक जिल्हाधिकार्‍यांकडे मांडून त्याबाबतचे किमतीतील पैशांसंबंधी शेतकर्‍यांना व बाधीत व्यक्तींना न्याय देण्याचा प्रयत्न होईल त्यासाठी मी प्रयत्न करेल. अशी ग्वाही आमदार सरोज आहिरे यांनी दिली.
प्रशासनातर्फे शेतकर्‍यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी विहीतगावच्या एका लॉन्समध्ये रिंगरोड बाधीत शेतकर्‍यांची बैठक झाली. त्या बैठकीत उपजिल्हाधिकारी अभिजीत नाईक, उपजिल्हाधिकारी महेश जमधडे, नाशिक प्रांत अर्पिता ठुबे हे भूसंपादन प्रक्रियेतील अधिकारी उपस्थित होते. या रिंगरोडसंबंधीची सविस्तर माहिती त्यांनी नकाशावरून शेतकर्‍यांना दिली. त्यात पाथर्डी, पिंपळगाव खांब, वडनेर दुमाला व रेल्वेच्या पूर्व भागातील रिंगरोड बाधित शेतकरी ज्यांची घरे जाणार आहेत. प्रामुख्याने अरिंगळे मळ्यातील 99 वर्षांच्या कराराने घेतलेल्या भूखंडावर घरे बांधलेले व गुंठेवारीवर जागा घेऊन इमले उभारलेले नागरीक व महिला मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते. जमिनीचा मोबदला कशा प्रकारे मिळणार? रस्ता गेलेल्या जमिनीच्या दोन्ही बाजूला शेतीचे तुकडे उरले त्याचे काय करणार? त्याचाही मोबदला शेतकर्‍यांना देणार का? 99 वर्षांच्या कराराने घेतलेल्या जागेचे पैसे कुणाला मिळणार? कारण सातबारा उतार्‍यावर मूळ मालकाचे नाव असेल, पण जागेवर प्रत्यक्ष कब्जा असलेल्याची नावे नसतील. त्यांना इतरत्र जमीन देणार का? महापालिका क्षेत्रातील या अल्पभूधारक व रहिवाशांची व्यवस्था सरकार करणार का? अशा अनेक समस्या या सर्वांनी या अधिकार्‍यांपुढे मांडल्या. त्यावर अधिकार्‍यांनी सविस्तर माहिती देऊन भूसंपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अभिजीत नाईक यांच्याकडे आपल्या मागण्यांसाठी अर्ज करावे असेही सुचविण्यात आले. कायद्यातील तरतुदीनुसार सर्वांना न्याय दिला जाईल, असेही या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.
यावेळी निवृत्ती अरिंगळे, प्रभाकर पाळदे, विक्रम कोठुळे, गणेश खर्जुल, सुरेश नेहे, संजय हांडोरे, अनिल गायकवाड, अशोक नेहे, श्याम नेहे, शिवाजी अरिंगळे, शाम हांडोरे, भाऊसाहेब खालकर, सचिन आहेर, भगवान दोंदे, उत्तम जाधव, उत्तम कोठुळे, बोराडे, अरुण पोरजे, अण्णा पाटील, भगीरथ हांडोरे, जयेश हांडोरे, मनीष हांडोरे, संजय कोठुळे, रघुनाथ हगवणे, बापू हगवणे, संजय हांडोरे, रामदास कोठुळे, संपत हांडोरे, संग्राम वाघ, किरण कोठुळे, पुंडलीक जाधव, सोमनाथ बोराडे, शरद हांडोरे आदींनी आपल्या समस्या मांडल्या. अधिकार्‍यांनी काही शेतकर्‍यांच्या बाधित जागेवर प्रत्यक्ष भेटही दिली.

अद्याप शासकीय कामकाज सुरू झालेले नाही. प्रत्यक्ष सर्व्हेच्या ठिकाणी शेतकर्‍यांनी जातीने उपस्थित राहून माहिती द्यावी. जो रहिवासी आहे त्यानेही आपल्या घरासंबंधी सविस्तर सांगावे. त्याची नोंद करून द्यावी आदींबाबत या अधिकार्‍यांनी स्पष्टीकरण दिले. गुरुवारी गॅझेट प्रसिद्ध होईल, त्यातील सर्व्हे नंबरवरून रस्ता कुठून जातो याची शेतकर्‍यांना कल्पना येईल. त्याची माहिती गावच्या तलाठ्यांकडेही नकाशावरून शेतकर्‍यांना मिळेल. हा रस्ता फारसा उंच होणार नाही, त्यावर टोल राहणार नाही, तीन भागांत तो तयार केला जाईल. गावाजवळ सर्व्हिस रोड असेल, असेही सांगण्यात आले.

Ring Road affected people present their grievances to the authorities

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

11 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

11 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

11 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

11 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

12 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

12 hours ago