नाशिक

कर थकबाकी सातशे कोटींवर

थकबाकीदारांना जप्तीच्या नोटिसा, निवडणूक कामामुळे वसुलीवर परिणाम

नाशिक : प्रतिनिधी
महापालिका प्रशासनाने नव्या आर्थिक वर्षात 270 कोटी वसुलीचे आव्हान दिले आहे. 19 जानेवारीपर्यंत 211 कोटींची वसुली होऊ शकली आहे. चालू व मागील अशी एकूण तब्बल 707 कोटींची थकबाकी वसुलीचे आव्हान महापालिकेसमोर आहे.
महापालिका निवडणुुकीकरिता विविध विभागांतील अधिकारी, कर्मचार्‍यांवर निवडणूक कामाची जबाबदारी देण्यात आली होती. दरम्यान, कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने याचा मोठा फटका करवसुलीला बसला आहे. मागील थकबाकी सहाशे कोटी, तर चालू 107 अशी एकूण सातशे कोटींची थकबाकी झाली आहे. थकबाकी न भरणार्‍यांना कर विभाग जप्तीच्या नोटिसा धाडणार आहेत.
नाशिक महापालिकेत एकूण सहा लाख 13 हजार मिळकतींची संख्या आहे. परंतु यातील तब्बल सातशे कोटींची थकबाकी पडून आहे. दरम्यान, थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेने जूनपासून शास्तीवर 95 ते 75 टक्क्यांपर्यंत सूट दिली होती. यात प्रारंभी जून ते ऑगस्टदरम्यान वसुली बर्‍यापैकी झाली होती. पण सप्टेंबरच्या मध्यापासून निवडणुकीचे काम सुरू झाले. यासाठी करसंकलन विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांवर निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली. मात्र, यामुळे अभय योजनेकडे मिळकतदारांनी दुर्लक्ष केले. परिणामी थकबाकी ज्या तुलनेने वसूल होण्याची अपेक्षा होती त्याला फटका
बसला आहे.

चालू आर्थिक वर्षात 270 कोटी वसुलीचे उद्दिष्ट होते. आतापर्यंत 211 कोटींची वसुली झाली आहे. करवसुलीसंदर्भात पुढील आठवड्यात बैठक घेतली जाणार आहे. त्यानंतर थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या जातील.
– अजित निकत, उपायुक्त, कर विभाग, मनपा

Tax arrears at seven hundred crores

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

10 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

10 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

11 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

11 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

11 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

11 hours ago