नाशिक

रिंगरोडच्या जमीन खरेदीचा आज श्रीगणेशा

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरालगत प्रस्तावित 66 किलोमीटर लांबीच्या महत्त्वाकांक्षी रिंगरोड प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रियेला मंगळवार (दि.31) मार्च प्रत्यक्ष सुरुवात होत आहे. जमीन खरेदीचा श्रीगणेशा दिंडोरी तालुक्यातील मानोरी येथून होत आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन थेट खरेदी आणि पारंपरिक भूसंपादन अशा दुहेरी पद्धतीने घेतली जात आहे.
राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन आणि संबंधित यंत्रणांमार्फत हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. वाढती वाहतूक कोंडी, शहरातील गर्दी आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने सुलभ वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी हा रिंग रोड अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. शहराभोवती वळसा घालणारा हा मार्ग तयार झाल्यास जड वाहतूक शहराबाहेरून वळवता येणार असून, नाशिकच्या वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे.या प्रकल्पासाठी जमीन संपादन करताना शेतकर्‍यांना थेट खरेदीच्या माध्यमातून 25 टक्के अधिक मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेक बाधित शेतकरी स्वखुशीने जमीन देण्यास पुढे येत आहेत.
या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.31) मार्च मानोरी येथील दोन शेतकर्‍यांच्या जमिनींची खरेदी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील मुद्रांक नोंदणी अधिकारी व्ही. डी. राजुळे यांच्याकडे नोंदवली जाणार आहे.

एका शेतकर्‍याला जमिनीबदल्यात तीन कोटी 19 लाख 65 हजार 420 रुपये इतका मोबदला मिळणार आहे. तसेच दुसर्‍या शेतकर्‍याला सहा कोटी 90 लाख 26 हजार 838 रुपये मोबदला देण्यात येणार आहे. या दोन्ही व्यवहारांसाठी एकूण सुमारे 10 कोटी 9 लाख 92 हजार 258 रुपये वितरित केले जाणार आहेत. प्रकल्पाच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात थेट खरेदीद्वारे जमीन संपादन होऊ लागल्याने प्रशासनाला गती मिळणार आहे. पुढील काळात इतर गावांमधील जमीन व्यवहारही वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. विभागीय आयुक्त तथा कुंभमेळा अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत हे खरेदीखत होणार आहे. जमीन विक्रेत्यांना त्याच्या जमिनीच्या मोबदल्याचा धनादेश डॉ. गेडाम यांच्या हस्ते दिला जाणार आहे.

रिंगरोड प्रकल्पामुळे केवळ वाहतूक सुलभ होणार नाही, तर शहराच्या सर्वांगीण विकासालाही चालना मिळणार आहे. औद्योगिक, व्यापारी आणि निवासी विस्तारासाठीही या मागार्मुळे नवे पर्याय उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पाकडे नाशिककरांच्या मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे. आज याच प्रकल्पाचे पहिले खरेदीखत होत आहे. – राजेंद्र वाघ, भूसंपादन अधिकारी

 

Ring Road land purchase to be inaugurated today

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

16 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

16 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

16 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

16 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago