नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विशेषतः मंगळवारी (दि. 31) नाशिकसह घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, नागरिक व शेतकर्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आयएमडीने हा अंदाज प्रसिद्ध केला आहे.
31 मार्च, 1 व 2 एप्रिल या तीन दिवसांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
मंगळवारी ऑरेंज अलर्ट दरम्यान हवामान अधिक बिघडण्याची शक्यता असून, वार्याचा वेग 50 ते 60 किमी प्रतितासपर्यंत जाऊ शकतो. यासोबतच काही भागांत गारपीट होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातही वादळी पावसाचा अंदाज
30 मार्चपासून राज्यात ढगाळ वातावरणासह दुपारनंतर वादळी पावसाचे सत्र सुरू होण्याची शक्यता आहे. खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. 31 मार्चला पावसाचे प्रमाण थोडे कमी होण्याची शक्यता असली तरी, 1 ते 4 एप्रिलदरम्यान पुन्हा वादळी पावसाची तीव्रता वाढू शकते.
शेतकर्यांना सतर्कतेचा इशारा
अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेली पिके आणि फळबागांना मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे शेतकर्यांनी काढलेले धान्य सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावे किंवा झाकून ठेवावे, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
नागरिक व शेतकर्यांसाठी सूचना
विजा कडाडत असताना झाडाखाली उभे राहणे टाळावे.
मोकळ्या जागेत थांबू नये.
घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज तपासावा.
वादळी वार्यापासून स्वतःचा व जनावरांचा बचाव करावा.
वीज खांब, ट्रान्सफॉर्मर व तारा यांच्याजवळ जाणे टाळावे.
महत्त्वाचे अलर्ट
31 मार्च- ऑरेंज अलर्ट (वादळ व गारपीट शक्यता)
1 व 2 एप्रिल- यलो अलर्ट
वार्याचा वेग- 40 ते 60 किमी प्रतितास
मेघगर्जना, विजांचा कडकडाट, गारपीट शक्य.
Orange alert for the district today; Hail warning
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…