महाराष्ट्र

एसआयआरविरोधात गर्जना

ठाकरे बंधूंकडून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी

♦ मुंबईतील मोर्चात तुफान गर्दी

♦ महिला, तरुणांची लक्षणीय उपस्थिती

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या पुनर्विलोकनावरून (एसआयआर) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वात रविवारी मुंबईत महागर्जना मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तुफान गर्दी जमली होती. कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिक, महिला अन् तरुणांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली. एसआयआर प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत, महाराष्ट्रातील मतदार याद्यांची विशेष सखोल पुनर्तपासणी (एसआयआर) रद्द करण्याची मागणी नेत्यांसह आंदोलकांनी केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर व निर्णयांवर आक्षेप घेत त्यांच्याही राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमापासून सुरू होऊन बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयावर मोर्चा नेण्यात आला. तिथे त्याचे जाहीर सभेत रूपांतर झाले. मोर्चामध्ये कोणत्याही पक्षाचे झेंडे दिसले नाहीत. सहभागी कार्यकर्ते, आंदोलकांनी राष्ट्रध्वज तिरंगा सोबत आणला होता. राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल झाले. या मोर्चात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुख हेही सहभागी झाले
होते.
निवडणूक आयोगाच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकदा एकाच मंचावर आले. मुंबईत या मोर्चाच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी मनसे नेते राज ठाकरे यांनी दोन मुख्य मागण्या केल्या. महाराष्ट्रात राबवण्यात आलेली सदोष एसआयआर प्रक्रिया रद्द करावी आणि भविष्यातील सर्व निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपर (मतपत्रिका)द्वारे घेण्यात याव्यात, हे दोन मुख्य मुद्दे त्यांनी मांडले. सत्तेवर कोण येईल हे निवडणूक आयोगाने ठरवू नये, तर तो निर्णय जनतेने घ्यावा, असेही राज ठाकरे यांनी म्हटले. उद्धव ठाकरे म्हणाले की, विरोधी पक्षांचा लढा कोणत्याही विशिष्ट पक्ष किंवा नेत्याविरुद्ध, धर्म किंवा जातीविरुद्ध नसून, देशाच्या स्वातंत्र्यासाठी आहे. भाजपने हे लक्षात घेतले पाहिजे की, आज जनता शांत आहे. जर ते संतप्त झाले तर ते भाजपचे सिंहासन जाळून टाकतील, असा इशाराही उद्धव यांनी दिला. भाजपने केवळ मते आणि लोकप्रतिनिधीच नव्हे, तर अयोध्येतील राम मंदिरासाठी दिलेल्या देणग्याही चोरल्याचा आरोप त्यांनी केला. एसआयआरअंतर्गत महाराष्ट्रात सुमारे दोन कोटी मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा दावाही उद्धव ठाकरे यांनी केला.

उद्धव ठाकरेेंचे निवडणूक आयोगावर ताशेरे
शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण केले आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. निवडणूक आयोगाच्या आणि आयुक्तांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत लोकशाहीचा घात होत असल्याचा आरोप त्यांनी केला. ज्ञानेश कुमार हे भाजपचे बाहुले म्हणून काम करत असल्याचा आरोप करत मतदारयादी फेरबदलामागील तर्कशुद्धतेवर उद्धव यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जर मतदार यादीतून बांगलादेशींना वगळण्यासाठी एसआयआर राबवण्यात आला होता, तर देशात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणारे किती बांगलादेशी सरकारला आढळले? असा प्रश्न उद्धव यांनी विचारला.

निवडणुकीत भाजपचा मतांचा वाटा का वाढला? : राज ठाकरे
महाराष्ट्रातील 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील विरोधी पक्षांच्या कामगिरीचाही राज यांनी उल्लेख केला. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा मतांचा वाटा वाढला आणि विरोधी पक्षांचा मतांचा वाटा अचानक कसा काय घसरला, असा सवालही राज यांनी केला. पूर्ण बहुमत मिळूनही कुठलाही विजयोत्सव न होता, राज्यात सर्वत्र सन्नाटा का होता, असा सवालही राज ठाकरे
यांनी केला.

 

 

Roar of protest against SIR

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago