मुंबई- आग्रा महामार्गावरील मुंढेगावजवळील प्रकार
घोटी : प्रतिनिधी
नाशिक- मुंबई महामार्गावर इंदूरहून निघालेल्या स्कॉर्पिओ वाहनाला मुंढेगावजवळील जिंदाल कंपनीवरील पुलावर अडवून चालकाला मारहाण करीत वाहन पुन्हा नाशिक बाजूकडे घेऊन जात राजूर फाट्याजवळ नेऊन लुटले. यात लुटारूंनी साडेचार लाख रुपयांची रक्कम लुटल्याची फिर्याद वाडीवर्हे पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
अधिक माहिती अशी की फिर्यादी धर्मेंद्र पटेल (वय 48, रा. सुरत, गुजरात) हा किरण पटेल यांच्याकडे चालक म्हणून काम करत असून तो ग्वाल्हेर येथून मालकाचे सोने चांदीचे दागिने आणण्यासाठी साडेचार लाख रुपये घेऊन स्कॉर्पिओने (डीएल 7 सीएस 4106) मुंबई येथे येत असताना पहाटे साडेपाचच्या दरम्यान मुंढेगावजवळील जिंदाल कंपनीसमोरील रेल्वे पुलावर इनोव्हा वाहन आडवे लावून स्कॉर्पिओ गाडीला अडवले. चालकाला मारहाण करीत शेजारी बसलेल्या दुसर्या व्यक्तीलादेखील मारहाण केली व तेथून स्कॉर्पिओ गाडी वळवून नाशिककडे परत फिरवले. राजूर फाट्याजवळ असलेल्या गुरुद्वारामागे नेत स्कॉर्पिओ वाहनातील साडेचार लाख रुपयांची रक्कम लुटून नेली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच वाडीवर्हे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती दिली.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…