नाशिक

निफाड तालुका थंडीने गारठला

पारा 6.1 अंशांवर, वाडी-वस्तीवर पेटल्या शेकोट्या

निफाड : तालुका प्रतिनिधी
नोव्हेंबरच्या दुसर्‍या पंधरवड्यापासून सुरू झालेल्या थंडीत
दिवसागणिक वाढ होत असून, गुरुवारी (दि. 11) निफाड गहू कृषी संशोधन केंद्रावर 6.1 अंश तापमानाची नोंद झाली. अवघा तालुका थंडीने गारठू लागला आहे. थंडीपासून बचावासाठी तालुक्यातील खेडेगावात तसेच वाडी-वस्तीवर शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करताना बालगोपाळांसह वयोवृद्ध नागरिक दिसून आले. थंडीत वाढ झाल्याने स्वेटर, मफलरला मागणी वाढली आहे.

आठवड्यात थंडीचा माहोल कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. दिवसागणिक थंडीत वाढ होताना दिसत आहे. वाढत्या थंडीमुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत. द्राक्षबागेत चिपाटे पेटवून उष्णता तयार करू लागले आहेत. थंडीमुळे द्राक्षवेलींची अन्नद्रव्य तयार करण्याची क्षमता कमी झाली असून, थंडीच्या प्रमाणात आणखी वाढ झाली तर द्राक्षमण्यांना तडे जाणे, पाने करपणे, असे प्रकार वाढण्याची शक्यता आहे. सध्याची थंडी गहू, हरभरा, कांदा पिकासाठी लाभदायक असली तरी आणखी थंडीत वाढ झाल्यास कांदापात करपणे, गहू आडवा पडणे, असे प्रकार वाढण्याची शक्यता आहे. बाजारपेठेत उबदार कपड्यांना मागणी वाढली आहे. उत्तरेकडून येणार्‍या वार्‍यामुळे थंडीत वाढ झाल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरवर्षी डिसेंबरअखेर आणि जानेवारीच्या सुरुवातीस थंडीच्या प्रमाणात वाढ होत असते. यंदा मात्र थंडीने नोव्हेंबरमध्येच आपले रूप दाखवले असून, सुरू झालेला थंडीचा माहोल मार्चपर्यंत कायम राहील, असा अंदाज व्यक्त होत आहे. सध्या तालुक्यात कांदा लागवडीसह शेती मशागतीची कामे सुरू असून, वाढत्या थंडीचा परिणाम होताना दिसत आहे.

 

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

19 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

19 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

19 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

20 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

20 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

20 hours ago