दरोड्यातील संशयिताला पाठलाग करून पकडले; गावठी कट्टासह काडतूस जप्त

नाशिकरोड पोलिसांची कारवाई 
नाशिकरोड :प्रतिनिधी
गेल्या काही दिवसापासुन उपनगर आणि नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढलेल्या चोरीच्या घटना रोखण्याकरिता पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. दरम्यान नाशिकरोड पोलिसानी दरोडय़ाच्या गुन्ह्यातील संशयिताला पाठलाग करून ताब्यात घेत मोठी कारवाई केली तसेच यावेळी त्याच्याकडून गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आली. राहुल अजय उज्जैन वाल (वय 21 रा. साई श्रद्धा अपार्टमेंट फ्लॅट नंबर 2 फर्नांडिस वाडी, उपनगर) असे ताब्यात घेतलेल्या संशयित चे नाव आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्याचे पोलीस नाईक विशाल पाटील यांना गुप्त खबर मिळाली की, उपनगर पोलिसांना दरोडा गुन्ह्यातील हवा असलेला संशयित फरार असून तो जेलरोड येथील पाण्याच्या टाकी जवळ येणार असल्याचे समजले. त्यानंतर ही माहिती पाटील यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना दिली. त्यानुसार शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पोलीस निरीक्षक गणेश न्यायदे, राजू पाचोरकर, उपनिरीक्षक योगेश पाटील, हवालदार अनिल शिंदे, मनोहर शिंदे विशाल पाटील, अविनाश देवरे, विष्णू गोसावी, सोमनाथ जाधव, राकेश बोडके, केतन कोकाटे, कुंदन राठोड आदीसह जेलरोड येथे पाण्याच्या टाकीजवळ सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार संशयित जेलरोड येथील कॅनॉल रोडणे येताना दिसला त्याच्या संशयास्पद हालचाली लक्षात घेता त्याला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु तो पोलिसांना पाहून पळू लागला. त्यानंतर त्याचा पाठलाग करून शिताफीने त्यास ताब्यात घेत अटक केली. त्यानंतर त्याची चौकशी केली असता त्याचे नाव राहुल उज्जैनवाल असल्याचे समजले. त्याचप्रमाणे त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस आढळून आले. असून पोलिसांनी हे जप्त केले आहे. नाशिकरोड पोलिसांनी केलेल्या या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे उपायुक्त विजय खरात सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *