नाशिक

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी

यानुसार असेल काम
टेंडर 1 : नाशिकरोड, पंचवटी व नाशिक पूर्व विभाग- खर्च 23 कोटी
टेंडर 2 : सातपूर, नाशिक पश्चिम, सिडको – 17 कोटी

नाशिक : प्रतिनिधी
महापालिका कोट्यवधींचा खर्च करूनही शहरात डेंग्यूसह स्वाइन फ्लूचा उद्रेक पाहावयास मिळत आहे. दरम्यान, धूर फवारणीचा (पेस्ट कंट्रोल) ठेका संपुष्टात आला असून, आरोग्य विभागातर्फे 15 दिवसांत निविदाप्रक्रिया राबवली जाणार आहे. तीन वर्षांसाठी 40 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. नाशिकरोड, पंचवटी व नाशिक पूर्वसाठी 23 कोटी, तर नाशिक पश्चिम, सातपूर व सिडको (नवीन नाशिक)साठी 17 कोटी, असे दोन टेंडर प्रसिद्ध केले जाणार आहते. अटी-शर्थीत ड्रोनद्वारे धूर फवारणीची नवीन अट घातल्याने त्याला मक्तेदार कसा प्रतिसाद देतात, हे लवकरच समजणार आहे.
शहरात डेंग्यूसह स्वाइन फ्लू व साथीच्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी धूर फवारणी केली जाते; परंतु नगरसेवकांनी केल्या जाणार्‍या धूर फवारणीवर नगरसेवकांसह नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. महापालिका पेस्ट कंट्रोलचे काम ठेकेदाराच्या माध्यमातून करते. मात्र, संबंधित ठेकेदार दर्जाहीन, निकृष्ट काम करत आहेत. याद्वारे
महापालिका प्रशासनाची केवळ आर्थिक लूट केली जात आहे. धूर फवारणीचा डासांवर कुठलाही परिणाम होत नसून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळले जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला होता. धूर फवारणीचे काम महापालिकेने ठेकेदाराला न देता प्रशासनाने स्वत:च ते करण्याची मागणी महासभेत केली होती. महापालिकेकडे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने ठेकेदाराकडून ते करून घेण्याशिवाय पर्याय नाही.
दरम्यान, ठेकेदार महापालिकेकडून नियमित देयके घेतो; पण काम करणार्‍या कर्मचार्‍यांना 22 हजारांच्या वेतनाऐवजी ठेकेदार अवघे आठ हजार रुपयेच वेतन देत असल्याचा आरोप स्थायी सदस्यांनी केला होता. त्यावेळी संबंधित ठेकेदाराचे बिल थांबवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता पेस्ट कंट्रोलचे नव्याने काम देताना महापालिका प्रशासनाने भविष्यात ठेकेदाराच्या तक्रारी आल्यास त्याच्यावर कारवाईची तरतूद करून ठेवण्याची आवश्यकता आहे.

Rs 40 crore spent on mosquito spraying

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

6 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

6 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

6 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

7 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

7 hours ago

मंत्रोच्चाराच्या घोषात त्र्यंबकेश्वरला ध्वजस्तंभ पूजन

कामे वेळेत पूर्ण करण्यावर पालकमंत्री गिरीश महाजन यांचा भर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या…

7 hours ago