नाशिक

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट

♣ नवदुर्गां ♣

नाशिक : प्रतिनिधी
महिला आता विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. पारंपरिक चौकटीपलीकडे जाऊन करिअरची वेगळी वाट निवडणार्‍या या नवदुर्गांपैकी एक म्हणजे, नाशिकच्या सुचिता पाटील. वाणिज्य शाखेचे शिक्षण घेतलेल्या सुचिता यांनी रेमॉन कॅफेच्या माध्यमातून व्यावसायिक क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. एका वडिलांच्या त्यागातून त्यांना मिळालेली प्रेरणा आणि त्यातून साकारलेली पन्नास रुपयांच्या पिझ्झ्याची संकल्पना त्यांच्या प्रवासाचे वैशिष्ट्य ठरली आहे.
सुमारे सहा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या प्रवासात सुचिता यांना राहुल सिकसुरे आणि कुटुंबीयांची मोलाची साथ लाभली. एके दिवशी एक वडील आपल्या मुलाला घेऊन कॅफेमध्ये आले. मुलाला दीडशे रुपयांचा पिझ्झा खायचा होता. मात्र, वडिलांकडे केवळ शंभर रुपये होते. त्यामुळे त्यांनी मुलाला पन्नास रुपयांचा बर्गर घेण्यास समजावण्याचा प्रयत्न केला. हा प्रसंग पाहून सुचिता आणि राहुल यांनी त्या मुलाला शंभर रुपयांत पिझ्झा देण्याचे ठरवले. मात्र, या प्रसंगाने सुचिता यांच्या मनावर खोलवर ठसा उमटला. मुलाला पिझ्झा मिळाल्यानंतर त्या वडिलांनी स्वतः त्यातील एक घासही खाल्ला नाही. मुलाने पोटभर पिझ्झा खावा, हीच त्यांची इच्छा होती. मुलाच्या आनंदासाठी स्वतःची इच्छा बाजूला ठेवणार्‍या वडिलांचा त्याग सुचिता यांना भावला. त्यातूनच प्रत्येकाला परवडणार्‍या दरात पिझ्झा उपलब्ध करून देण्याची कल्पना त्यांच्या मनात आली.
ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी पुण्यात जाऊन खाद्यपदार्थ निर्मितीविषयक अभ्यासक्रम पूर्ण केला. कौशल्य वाढवत आणि कुटुंबाच्या पाठबळावर आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत त्या 2025 पासून रेमॉन कॅफेमध्ये अवघ्या पन्नास रुपयांत पिझ्झा उपलब्ध करून देत आहेत. परवडणार्‍या दरात पिझ्झा मिळत असल्याने कॅफेमध्ये आबालवृद्धांंसह सर्वांचीच गर्दी होत असल्याने सुचिता यांच्या कॅफेच्या व्यवसायाला नवीन भरारी मिळाली आहे.
एका भावनिक अनुभवातून जन्माला आलेली ही संकल्पना सुचिता यांच्या जिद्दीची, कल्पकतेची आणि माणुसकीची ओळख बनली आहे. स्वतःचे स्वप्न साकारतानाच इतरांच्या आनंदाचाही विचार करणार्‍या सुचिता यांची व्यावसायिक वाटचाल उद्योजिकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

A business takeoff from a fifty-rupee pizza

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

6 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

6 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

6 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

7 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

7 hours ago

मंत्रोच्चाराच्या घोषात त्र्यंबकेश्वरला ध्वजस्तंभ पूजन

कामे वेळेत पूर्ण करण्यावर पालकमंत्री गिरीश महाजन यांचा भर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या…

7 hours ago