चॉइस नंबरमुळे आरटीओला 19 कोटी 59 लाख महसूल

14 हजार 638 वाहन मालकांची पसंती

पंचवटी : सुनील बुनगे
नवीन वाहन घेतल्यानंतर अनेक वाहनमालक आपल्याला आवडतो त्या नंबरला पसंती देतात. चॉइस नंबरसाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून शुल्क आकारले जाते. त्यामुळे सन 2025-26 मध्ये सुमारे 14 हजार 638 वाहनमालकांनी चॉइस नंबरच्या माध्यमातून प्रादेशिक परिवहन विभागाला (आरटीओ) सुमारे 19 कोटी 59 लाख 39 हजार महसूल दिला आहे. 2024-25 च्या तुलनेत पाच कोटी 35 लाख 18 हजार 500 रुपयांची वाढ झाली आहे.
हौसेला मोल नसते तेही तितकेच खरे. त्यात वाहन घेतल्यानंतर आपल्या वाहनाला चॉइस नंबर मिळावा यासाठी वाहनमालक वाट्टेल तितके पैसे मोजण्याची तयारी ठेवतात. वाहनाला चॉइस नंबर घ्यायचा असेल त्यातही नवीन नंबरची मालिका सुरू झाल्यावर अर्ज दाखल करावा लागतो. जर एका चॉइस नंबरसाठी जास्त वाहन मालकांनी अर्ज केला तर त्या नंबरसाठी लिलाव पद्धतीने बोली लागते. तसेच आपल्याला आवडीचा पुढचा (जम्पिंग) नंबर घ्यायचा असेल त्यासाठीदेखील शासकीय शुल्क भरावे लागते. असेही नंबर अनेक वाहनमालक घेतात. याच माध्यमातून प्रादेशिक परिवहन विभागाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. अशाच प्रकारे 2024-25 मध्ये 4 हजार 666 दुचाकी, तर 5 हजार 521 चारचाकी आणि 2 हजार 400 इतर वाहन मालकांनी सुमारे 14 कोटी 23 लाख 20 हजार 500 रुपये महसूल मिळाला होता. यावर्षी 2025-26 मध्ये यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 14 हजार 638 वाहनमालकांनी चॉइस नंबर घेतले आहेत. त्या माध्यमातून आरटीओला सुमारे 19 कोटी 59 लाख 39 हजार महसूल मिळाला आहे. 2025-26 मध्ये पाच हजार 441 दुचाकी, तर सहा हजार 203 आणि दोन हजार 994 वाहनमालकांनी चॉइस नंबर घेतले आहेत.

पाच कोटी 36 लाख महसूल वाढला
सन 2024-25 मध्ये 12 हजार 587 वाहनमालकांनी चॉइस नंबरला पसंती दिली होती. त्या तुलनेत 2025-26 मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावर्षी सुमारे 14 हजार 638 वाहनमालकांनी चॉइस नंबर घेतले असून, गतवर्षीच्या तुलनेत दोन हजार 51 जास्त वाहनमालकांनी चॉइस नंबर घेतले आहेत. यात 775 दुचाकी, तर 602 चारचाकी आणि 594 इतर, असे वाहनमालक आहेत. त्या माध्यमातून पाच कोटी 36 लाख 18 हजार 500 इतका जास्त महसूल आरटीओला मिळाला आहे.

 

RTO earns Rs 19 crore 59 lakh in revenue due to choice number

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *