शिवसेनेसाठी मुस्लीम दाम्पत्याचे तुळजाभवानीसह अजमेर दर्ग्याला साकडे

नाशिक : अश्विनी पांडे

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्यायहक्कांसाठी शिवसेनेची स्थापना केली. ते असतांना छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे यांनी बंड केले. व त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेनेत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यभरात शिवसैनिक अस्वस्थ झाले आहे. त्यामुळे गोदाकाठचे सायखेडा येथील कट्टर मुस्लिम शिवसैनिक व ग्रामपालिका सदस्य अशपाक शेख व त्यांच्या पत्नी समिना बानो शेख यांनी शिवसेनेच्या गतवैभवासाठी चक्क तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेला व अजमेरच्या मुस्लिम धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या दर्ग्यात प्रार्थना केली आहे. निफाडचे माजी आमदार अनिल कदम, बाळासाहेब क्षिरसागर, विक्रम रंधवे व सुधीर कराड, अनिल कुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अशपाक शेख शिवसैनिक म्हणून गोदाकाठमध्ये कार्यरत आहे. कोविड काळात जनतेला अहोरात्र सेवा देणाऱ्या अशपाक शेख यांची शिवसेनेवर अढळ श्रद्धा आहे. त्यामुळे त्यांनी सध्याच्या राजकीय सत्ता संघर्षात उद्धव साहेबांसाठी थेट अजमेरच्या दर्ग्यात प्रार्थना केल्याने चर्चेचा विषय झाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनपेक्षित बंडामुळे शिवसेना अडचणीत सापडली आहे. आमदारांना सोबत घेत बंड केल्याने शिवसेनेत मोठी फुट पडली. यातच राज्यभरात शिवसैनिक आक्रमक झाल्याचं चित्र आहे तर काही शहरात शिवसैनिक पक्षावरील संकट टळण्यासाठी भक्ती मार्गाचा अवलंब करताना दिसत आहे. मावळते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना फेसबुक लाईव्ह मार्फत भावनिक साद घातली होती. मात्र राज्याचं चित्र बदलत बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करतांना सामान्य शिवसैनिक मात्र प्रचंड भांबावला गेलाय, शिवसेनेला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावं, आलेल्या संकटाला तोंड देत उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी व पुन्हा शिवसेनेच्या सत्ता प्राप्तीसाठी सायखेडा ता निफाड येथील दोघेही ग्रामपालिका सदस्य असलेले शिवसैनिक श्री आशपाक शेख व त्यांच्या पत्नी सौ समीना शेख यांनी महाराष्ट्राचे कुलदैवत तुळजापूर येथील तुळजाभवानी माता तसेच मुस्लीम धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या अजमेर येथील दर्गा येथे प्रार्थना केल्याने चर्चेचा विषय झाला आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी जरी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली तरी गोदाकाठमध्ये सर्वच शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेतच सक्रिय असल्याची ग्वाही करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके-पाटील यांनी दिली.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *