शेतीच्या वादातून धाकट्याचा घेतला जीव
नाशिक : वार्ताहर
शेतीच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्यात टिकाव टाकून खून केल्याचा धक्कादायक प्रकार काल जलालपूर शिवारात घडला.
जलालपूर शिवारातील गट नं. 60 वरून सन 2015 पासून भावांमध्ये वाद सुरू होते. त्याची परिणती काल खूनामध्ये झाली.या प्रकरणी दोघा पिता पुत्राला अटक करण्यात आली.
संशयीत श्रीहरी कोंडाजी शेळके, जयदीप श्रीहरी शेळके असे अटक केलेल्या पिता पुत्राचे नावे आहेत. तर बळवंत कोंडाजी शेळके (वय 57 ) मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि अक्षय शेळके (रा.यशंवतनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जलालपूर येथे वडिलोपार्जित शेती आहे. मोठा भाऊ संशयित श्रीहरी कोंडाजी शेळके (60 ) हे अनेक वर्षापासून शेती करतात. मृत बळवंत शेळके आणि त्यांचे भाऊ कुटूंबियासह शेतावर गेले होते.
मोठा भाऊ संशयित श्रीहरी याने दोघा भावांना शेती करण्यास मज्जाव केला. तिन्ही भावांमध्ये वाद सुरु झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. संशयित श्रीहरी आणि त्याचा मुलगा जयदीप तसेच पत्नी सुमन यांनी बळवंत शेळके यांच्यावर हल्ला केला. एकाने बळवंत यांच्या डोक्यात टिकाव मारल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना त्यांचा मुलगा अक्षय आणि भावाने शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास तालुका पोलीस करीत आहेत.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…