राज्यसभा निवडणुकीतून संभाजी राजे यांची माघार
मुंबई प्रतिनिधी
राज्यसभा निवडणुकीतून छत्रपती संभाजी महाराज यांनी अखेर माघार घेतली काल मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती, परंतु आपण अपक्ष लढू इच्छितो, सर्व पक्षांनी आपल्याला मदत करावी, अशी आपली इच्छा होती, त्यावर महाविकास आघाडीतर्फे शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून संधी देऊ असा शब्द आपल्याला उद्धव ठाकरे यांनी दिला होता, पण मी कोल्हापूर ला जात असतानाच संजय पवार यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली, त्यामुळे आपल्याला धक्का बसला, मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असता तर घोडेबाजार झाला असता, म्हणूनच आपण माघार घेतली, असे तें म्हणाले,