नाशिक : वार्ताहर
माजी महापौर अशोक दिवे यांच्या “भाऊ” बंगल्यावर “सॅमसोनाईट साउथ एशिया लि. कंपनीत झालेल्या युनियनच्या निवडणुकीत मधुकरराव खडांगळे,नीलेश तिदमे,रमेश परदेशी,राजेंद्र सोनवणे,मंगेश नलावडे,सोमनाथ नाठे,सुनील थापेकर या पदाधिकाऱ्यांचा दणदणीत विजय झाला.
दिवे परिवारातर्फे या सर्वांचा माजी महापौर अशोक दिवे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ आणि पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी माजी नगरसेवक राहुल दिवे,नाशिकरोड प्रभाग समितीचे माजी सभापती तथा नामको बँकेचे व्हा.चेअरमन प्रशांत दिवे,आयएसपी मजदुर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे, एनएमसी नासिक एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीचे चेअरमन नानासाहेब साळवे, प्रेस युनियनचे जॉइंट सेक्रेटरी राजाभाऊ जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी महापौर अशोक दिवे, कामगार नेते जगदीश गोडसे यांनी कामगार कायदे व त्यात होणारे बदल, युनियनचे महत्त्व आदी विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
युनियन कमेटीचा सत्कार केल्याबद्दल नीलेश तिदमे यांनी दिवे कुटुंबीयांना धन्यवाद दिले. कामगार व कंपनीच्या हिताचे निर्णय घेऊन कंपनी व कामगारांची भरभराट होण्यासाठी प्रयत्नशील राहू,असा विश्वास नवनिर्वाचित युनियन कमेटीने सत्कारास उत्तर देताना दिला.आभार प्रदर्शन प्रशांत दिवे यांनी केले.
अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ सिडको।…
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…