सलग आठ तास रंगणार संस्कृती वैभव स्वरभास्कर महोत्सव…!!

माऊली टाकळकर पुणे, नाना मुळे मुंबई, आणि पंडित अविराज तायडे नाशिक, यांना यंदाचा संस्कृती वैभव पुरस्कार घोषित..!!

पंडितजींच्या जन्मशताब्दी वर्ष पूर्ती निमित्त नाशिककरांकडून आदरांजली
 कालिदास मंदिरात सलग आठ तास सांगीतिक जागर
, पंडित आनंद भाटे, पंडित उपेंद्र भट, पंडित हरीश तिवारी, पंडित श्रीनिवास भीमसेन जोशी, पंडित अविराज तायडे, आणि नातू कुमार विराज जोशी यांच्या मैफिली
 पंडितजींचे सहकारी, शिष्य आणि परिवारातील सर्व सदस्यांची उपस्थिती

नाशिक प्रतिनिधी – 2021 22 भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे जन्मशताब्दी वर्ष होते. याचेच औचित्य साधत संस्कृती वैभव संस्थेने स्वरभास्कर महोत्सव आयोजित करीत असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष नंदन दीक्षित यांनी आज केली.
रविवार दिनांक 18 जून रोजी सायंकाळी साडेचार ते रात्री साडेबारा या वेळेत तीन सत्रांमध्ये हा महोत्सव नाशिकच्या कालिदास कला मंदिर याठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी पंडितजींचे चिरंजीव जयंत जोशी, शुभदा जोशी मुळगुंद, पंडित श्रीनिवास जोशी आणि पंडितजींचा नातू चिरंजीव विराज जोशी यांच्यासह परिवारातील अनेक जण तसेच पंडित उपेंद्र भट, पंडित हरीश तिवारी, पंडित आनंद भाटे या दिग्गज मंडळींसह पंडितजींच्या सहवासातील मुकुंद संगोराम, सतीश पाकणीकर, सुधीर गाडगीळ वादक सहकारी पंडित नाना मुळे, माऊली टाकळकर, भरत कामत, सुधिर नायक, मुकुंदराज देव, नितीन वारे, सुभाष दसककर आणि डॉक्टर पंडित अविराज तायडे उपस्थिती लावणार आहेत. असे संस्थेचे उपाध्यक्ष पी एस कुलकर्णी यांनी सांगितले.
यावर्षीचे संस्कृती वैभव स्वरभास्कर महोत्सवाचे पुरस्कार पंडितजींना ४० वर्ष अखंडपणे साथ करणारे ज्येष्ठ टाळ वादक आदरणीय ज्ञानेश्वर उर्फ माऊली टाकळकर पुणे, ज्येष्ठ तबलावादक आदरणीय पंडित शशिकांत उर्फ नाना मुळे मुंबई, तसेच नाशिक मधील पंडितजींचे शिष्य डॉक्टर पंडित अविराज तायडे यांना घोषित करण्यात आले आहेत. संस्कृती आणि वैभव यांचा प्रतीक असलेली सुबक मूर्ती, सन्मान पत्र आणि
२१ हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. हे पुरस्कार जयंत जोशी शुभदा मुळगुंद आणि पंडित श्रीनिवास जोशी यांच्या हस्ते वाट प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती दीक्षित यांनी दिली. याशिवाय पंडितजींच्या जीवनावर आधारित अनेक मान्यवरांचे लेख असलेली संग्राह्य स्मरणिका देखील नाशिककरांना मिळणार आहे.
याशिवाय त्या जीवनावर आधारित अनेक मान्यवरांचे लेख असलेली संग्राह्य स्मरणिका देखील नाशिककरांना दिली जाणार आहे.
पंडितजींच्या छायाचित्रांवर आधारित त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचे काम जोशी परिवारातील जवळचे सदस्य आणि प्रसिद्ध छायाचित्रकार सतीश पाकणीकर करणार आहेत. पंडितजींच्या परिवारातील सदस्य आणि सहकारी यांच्याशी मनमुक्त गप्पा आणि सांगीतिक परिसंवाद यावेळी होणार आहे.
शिवाय पंडित आनंद भाटे, पंडित उपेंद्र भट, पंडित हरीश तिवारी, पंडित श्रीनिवास जोशी, डॉक्टर पंडित अविराज तायडे, आणि कुमार विराज जोशी यांच्या शास्त्रीय गायन, बंदिश, ठुमरी, संतवाणी अशा मराठी-हिंदी आणि विशेष करून कानडी भाषेतल्या मैफिली या महोत्सवात रंगणार आहेत. एकंदर अनेक वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी भरगच अशा या महोत्सवाची सूत्रसंचालन आणि मुलाखतीची बाजू सत्कार सुधीर गाडगे सांभाळणार असल्याचे प्रतिपादन अभिजीत पुराणिक यांनी केले.
जानेवारीत होणाऱ्या या महोत्सवाला तिसऱ्या लाटेमुळे पुढे ढकलण्यात आलं होतं. सलग दोन दिवस थिएटरची उपलब्धता नसल्याने एकाच दिवसात सलग आठ तास हा उत्सव साजरा करण्याचा निश्चय आयोजकांनी केला आहे. यावेळी रसिकांना सलग आठ तास महोत्सवाचा आनंद घेता यावा यासाठी चहा-कॉफी आणि पोटभर नाश्ता यांची सशुल्क सोय कलामंदिरात केली आहे असे मिसाळ यांनी सांगितले. महोत्सवाची आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी प्रायोजक आडावदकर ज्वेलर्स, सिवानंद इलेक्ट्रॉनिक्स, टी जे एस बी बँक, एल आय सी ऑफ इंडिया यांनी सहकार्य केले, तसेच टेलिव्हिजन पार्टनर म्हणून झी चोवीस तास आणि अन्य सहप्रायोजकांनी देखील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हातभार लावला आहे.
या महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य असून मोफत प्रवेशिका अडावदकर ज्वेलर्स, कॅनडा कॉर्नर, टी जे एस बी बँकेच्या सर्व शाखा, आणि कालिदास कला मंदिर या ठिकाणी उपलब्ध आहेत. रसिकांना प्रवेशिका मिळाल्या नाहीत त्यांनीदेखील कालिदास कलामंदिर मध्ये या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी नक्की येण्याचे करावे.
नाशिक आणि परिसरातील संगीत प्रेमी आणि विशेष करून पंडितजींवर भरभरुन प्रेम करणाऱ्या रसिकांनी या महोत्सवाला उदंड प्रतिसाद द्यावा असे आवाहन संस्थेचे खजिनदार रवींद्र देवधर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *