पीकविमा प्रश्नावर 24 जुलैला जिल्हाधिकार्यांसोबत होणार बैठक
निफाड : तालुका प्रतिनिधी
देवगाव महसूल मंडळातील खरीप 2025 हंगामातील प्रलंबित पीकविमा दाव्यांच्या प्रश्नावर प्रशासनासोबतची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर, शेतकरी बचाव कृती समितीने सोमवारी (दि. 20) देवगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू केलेले सरण आंदोलन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्तक्षेपानंतर मंगळवारी दुपारी तात्पुरते स्थगित करण्यात आले. दरम्यान, शेतकर्यांच्या मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी (दि. 24) जिल्हाधिकार्यांसोबत पुन्हा बैठक होणार असून, या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खरीप 2025 हंगामात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, मका, टोमॅटोसह विविध पिकांचे 70 ते 90 टक्क्यांपर्यंत नुकसान झाले होते. शासनाने पंचनाम्यांच्या आधारे नुकसानभरपाई दिली असताना विमा कंपनीने सदोष पीक कापणी प्रयोग, हवामान केंद्राच्या त्रुटीपूर्ण नोंदी आणि अन्यायकारक निकषांचा आधार घेत मोठ्या प्रमाणावर दावे फेटाळल्याचा आरोप शेतकर्यांनी केला. या अन्यायाविरोधात प्रतीकात्मक सरण उभारून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान मनोहर बोचरे, धनंजय जोशी, जयवंत लोहारकर आणि राजेंद्र मेमाणे हे प्रतीकात्मक सरणावर बसले
होते.
आंदोलनाला निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जितेंद्र भावे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे पाटील, राष्ट्रवादीचे नेते हरिश्चंद्र भवर, सचिन होळकर, अशोक नागरे, शिवाजी सुपनर, डॉ. श्रीकांत आवारे, विनोद जोशी, भाऊसाहेब बोचरे, माणुसकी फाउंडेशनचे सागर निकाळे, शिवा सुरासे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जगताप, प्रकाश घोटेकर, राजेंद्र पाटील यांच्यासह देवगाव महसूल मंडळातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
दरम्यान, तहसीलदार नाईकवाडे यांनी आंदोलकांचे जिल्हाधिकार्यांशी दूरध्वनीवरून बोलणे करून दिले. त्यानंतर जिल्हाधिकार्यांनी सायंकाळी 6 वाजता बैठक घेतली. बैठकीत कृषी विभागाने आवश्यक अहवाल व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी गुरुवारपर्यंत मुदत मागितली. त्यानुसार शुक्रवारी (दि. 24) आंदोलकांची जिल्हाधिकार्यांसमवेत पुन्हा बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. बैठकीत पीकविम्याबाबत ठोस निर्णय झाला नाही, तर शनिवारपासून अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा आंदोलकांनी दिला.
संबंधित प्रश्न राज्य मंत्रिमंडळात मांडू : भुजबळ
मंगळवारी (दि. 21) आंदोलनस्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी भेट देऊन आंदोलकांचे मंत्री भुजबळ यांच्याशी दूरध्वनीवरून थेट बोलणे करून दिले. या संवादात मंत्री भुजबळ यांनी शेतकर्यांच्या मागण्या गांभीर्याने ऐकून घेत जिल्हाधिकारी व कृषी विभागाला सकारात्मक कार्यवाहीच्या सूचना दिल्या. तसेच संबंधित प्रश्न राज्य मंत्रिमंडळात मांडून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन दिले. मंत्री भुजबळ यांच्या आश्वासनानंतर शेतकरी बचाव कृती समितीने सरण आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘Saran’ agitation suspended following Minister Bhujbal’s intervention!
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…