शेतकर्यांना दिलासा; पावसामुळे पिकांचे नुकसान
दिंडोरी : प्रतिनिधी
एकीकडे कांद्याच्या दरात चढ-उतार होत असून, टोमॅटो हंगामाच्या अंतिम टप्प्यात टोमॅटोला समाधानकारक दर मिळत असल्याने उत्पादकांना व शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीत पावसाने थैमान घातले होते, यामुळे अनेक पिकांचे नुकसान झालेे. शेतकर्यांचे आर्थिक गणित कोलमडले होते.
टोमॅटो हंगामाच्या प्रारंभी कवडीमोल दर टोमॅटोला मिळत होता. त्यात पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक टोमॅटो पिकाची वाताहत झाली होती. ज्या उत्पादकांनी उशिरा टोमॅटोची लागवड केली होती, अशा उत्पादकांचा टोमॅटो अंतिम हंगामाच्या सत्रात विक्रीसाठी उपलब्ध झाल्याने उत्पादकांना प्रारंभीच्या तुलनेत चांगला दर मिळाला. त्यात निसर्गाची अवकृपा असताना सतत परिश्रम व मेहनतीने पीक वाचवून दर्जेदार व चांगल्या प्रतीचा टोमॅटो ज्या उत्पादकांनी उत्पादित केला, त्यांना समाधानकारक दर मिळाल्याची माहिती बाजार समिती सभापती प्रशांत कड यांनी दिली.
टोमॅटो हंगामाचा कमी कालावधी शिल्लक असून, उत्पादकांना चार पैसे हातात येतात ही सकारात्मक बाब असून, प्रतवारी करून टोमॅटो विक्रीसाठी आणला तर अधिक भाव मिळतील, त्यादृष्टीने उत्पादकांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन उपसभापती योगेश बर्डे यांनी केले.
टोमॅटो उत्पादक विक्रीसाठी टोमॅटो बाजार समितीत आणतात. खरेदी-विक्री व लिलाव प्रक्रिया पार पाडल्यानंतर उत्पादकांना त्वरित पैसे देणे बंधनकारक असून, त्याचे पालन करावे व काही तक्रार असल्यास बाजार समितीकडे संपर्क साधावा.
– गंगाधर निखाडे, संचालक, बाजार समिती, दिंडोरीSatisfactory prices for tomatoes in the final stage
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…