नाशिक

देवगाव परिसरात पन्नास दिवसांत पाचवा बिबट्या जेरबंद

भीतीचे सावट कायम; रोज कुठल्या ना कुठल्या भागात वावर

लासलगाव : वार्ताहर
देवगाव परिसरात बिबट्यांच्या वाढत्या हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट अधिकच दाट होत असताना, परसराम बोचरे यांच्या देवगाव गट क्रमांक 96/1 मध्ये रात्री साडेअकराला बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजर्‍यात जेरबंद झाला. पन्नास दिवसांत हा पाचवा बिबट्या पकडला गेला आहे. अजूनही देवगाव परिसरात बिबट्याचा वावर असल्याने लोकांमध्ये व शेतकर्‍यांत भीतीचे वातावरण आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून दर दिवसाला कुठल्या ना कुठल्या भागात बिबट्याचा वावर व हल्ले होत आहेत. परिसरात जनावरांवरील हल्ल्यांंमध्ये वाढ होत आहे. रात्री शेतात जाण्याचा धोका आणि बिबट्यांची सतत होणारी हालचाल यामुळे बिबट्याचा सामना नागरिकांसाठी नित्याचाच झाला आहे. कमी कालावधीत पाच बिबटे पकडले गेल्यामुळे अजूनही देवगाव परिसरात पाच ते सहा बिबटे असल्याचा संशय नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्यात भीतीचे
वातावरण आहे.
वन विभागाने जंगलात सोडलेले बिबटे पुन्हा गावात परतत नाहीत ना? असा संशय ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. बिबट्या जेरबंद झाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक घटनास्थळी धाव घेऊन त्याला ताब्यात
घेतले.
परिसरात आणखी बिबटे असल्याची नागरिकांची खात्री आहे. तातडीने त्यांचा बंदोबस्त करावा व पिंजर्‍यांच्या संख्येत वाढ करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

असे झाले बिबटे पिंजराबंद

याआधी 12 नोव्हेंबर 2025 रोजी गावालगत असलेल्या शरद जोशी यांच्या गट क्रमांक 485 मधील पिंजर्‍यात नरभक्षक बिबट्या जेरबंद झाला होता. नंतर 21 नोव्हेंबरला चांगदेव शिंदे यांच्या गट क्रमांक 191 मध्ये दुसरा, 4 डिसेंबर रोजी पोलीसपाटील सुनील बोचरे यांच्या गट क्रमांक 414/2 मध्ये तिसरा, 21 डिसेंबरला म्हसोबानगर (कासली) शिवारात रावसाहेब रोटे यांच्या गट क्रमांक 603 मध्ये चौथा व 7 जानेवारी 2026 रोजी परसराम बोचरे यांच्या देवगाव गट क्रमांक 96/1 मध्ये पाचवा बिबट्या पकडला गेला.

Fifth leopard captured in Devgaon area in fifty days

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

5 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

5 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

5 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

5 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

5 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

6 hours ago