काय सांगता.. रुंगटा ग्रुपच्या ग्रॅण्डेझा फ्लॅट हातोहात संपले!

नाशिक : प्रतिनिधी
ललित रुंगटा ग्रुपने रुंगटा ग्रॅण्डेझाचे 100 टक्के बुकिंग करून पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. ललित रुंगटा ग्रुप ग्राहकांना विविध योजनांच्या माध्यमातून फ्लॅट आणि शॉप खरेदी करणे सोपे करून देतात.
हमारा सपना हर नाशिककर का घर और दुकान हो अपना हे मनात ठेवून फक्त ’एक रुपयात डाऊन पेमेंट भरून फ्लॅट बुक करा ही ऑफर गृहस्वप्न धारकांसाठी जाहीर केली. ती सत्यात उतरवली.
ग्रॅण्डेझा या प्रकल्पाचे लॉन्चिंग 1 एप्रिलला झाले. रात्री 12 वाजेपासून ग्राहकांनी नंबर लावला. आणि फ्लॅट बुकिंगला सुरुवात झाली. अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या प्रकल्पाला मिळाला. फक्त चार दिवसांत म्हणजे दि. 4 एप्रिलपर्यंत संपूर्ण प्रकल्प 100 टक्के बुक झाला. गोविंदनगरपासून जवळच असलेल्या ग्रॅण्डेझा या प्रकल्पात 30 पेक्षा जास्त ऍमेनिटीज आहेत. तसेच या प्रकल्पाचे पझेशन फक्त 11 महिन्यातच मिळणार असल्याने ग्राहकांनी कुठलाही विलंब न करता बुकिंग केल्या.
या ठिकाणी बनवलेला सॅम्पल अणि शो फ्लॅट ग्राहकांच्या पसंतीला पडला आहे. येथे घेतलेला फ्लॅट किती सुंदर असू शकतो हे पाहण्यासाठी ग्रॅण्डेझा प्रकल्पात सॅम्पल फ्लॅट आणि शो फ्लॅट दोन्हीही तयार करून ठेवलेले आहे.
ग्रॅण्डेझा या प्रकल्पात 11 महिन्यात फ्लॅटचा ताबा देण्यासाठी ललित रुंगटा ग्रुप सज्ज आहेत. येथे अनेक ग्राहकांना फ्लॅट मिळू शकले नाहीत. ग्रॅण्डेझामध्ये ज्यांना फ्लॅट मिळालेले नाही त्यांचे ललित रुंगटा ग्रुपचे संचालक निखिल रुंगटा यांनी दिलगिरी व्यक्त केली. लवकरच नाशिककरांसाठी काहीतरी नवीन योजना आणण्याची त्यांनी ग्वाही दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *