नाशिक

सॅटर्डे संडे सायकलिस्ट ग्रुप पंढरपूर वारीसाठी सज्ज

शुक्रवारपासून दोन दिवसांत करणार 360 किलोमीटर अंतर पार

पंचवटी : वार्ताहर
सॅटर्डे संडे सायकलिस्ट ग्रुपच्या वतीने नाशिक ते पंढरपूर सायकलवारी काढण्याचे नियोजन केले आहे. येत्या शुक्रवारी (दि.20) सायकल वारीची सुरुवात श्रीक्षेत्र औदुंबर भक्तमंडळ येथून होणार आहे.
नाशिक ते पंढरपूर 360 किलोमीटरचे अंतर दोन दिवसांत सॅटर्डे संडे ग्रुपचे सर्व सायकलिस्ट पार करणार आहेत. वारीचे वैशिष्ट्य म्हणजे, सर्व महिलांचा उत्कृष्ट सायकलिंगसाठी प्रतिसाद मिळत आहे. वारीसाठी सराव म्हणून प्रत्येक सायकलिस्ट गेल्या दोन महिन्यांपासून दररोज कमीत कमी 20 ते 25 किलोमीटर सायकलिंग करत आहे. शनिवार-रविवार 50 पेक्षा जास्त किलोमीटर सायकलिंग करत आहे. वारीचं वैशिष्ट्य म्हणजे, सोळा वर्षांच्या मुलीपासून तर 66 वर्षांच्या वृद्ध महिलांचा सहभाग आहे. महाराष्ट्राची वारीची उज्ज्वल परंपरा आता तरुणाईला ओढ लावत आहे. 16 ते 35 वर्षांमधील जास्तीत जास्त तरुण मंडळी सॅटर्डे संडे वारीत सहभागी होत आहे. त्यांच्यासोबत त्यांना मार्गदर्शन करणारे अनेक सिनिअर सिटीजनदेखील आहेत. तीन पिढ्या एकत्र असणारी पंढरपूरची वारी सगळ्यांना संस्मरणीय होणार आहे.
या वारीच्या तयारीसाठी अ‍ॅम्बुलन्स, दोन डॉक्टर, मेकॅनिकल टीम, ढोल-ताशे, दोन बस अशी पूर्ण टीम सज्ज आहे. वारीप्रमुख म्हणून सॅटर्डे संडे ग्रुपचे नाव देण्यात आले आहे. बाबू ताजनपुरे, शिवाजी काकड, कैलास भागवत, मीरा जोशी, चंदाराणी गवारे अशा ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली सॅटर्डे संडे ग्रुपची वारी निघत आहे.
यंदा पहिले वर्ष असल्यामुळे वारीचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. या वारीत अनेक शासकीय अधिकारी, सीए, डॉक्टर, वकील, शेतकरी असे सगळ्या क्षेत्रांत काम करणारे स्वतःसाठी तीन दिवस काढणार आहेत. यात उद्योजकही सहभागी होणार आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोक एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण होणार आहे. आध्यात्मिक असणारी ही वारी सगळ्यांनाच ऊर्जा देऊन जाणार असल्याने आता प्रत्येकाला विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. सायकलिंग करताना दर 20 किलोमीटरवर हायड्रेशनची सोय करण्यात आली आहे. नागरिकांना असे आवाहन करण्यात येते की, सॅटर्डे संडे ग्रुपच्या वारीला सर्वांनी मनापासून आशीर्वाद द्यावेत. सर्व सायकलिस्ट सुखरूप पंढरपूरला जाऊन नाशिकला परत येऊ देत. या वारीमध्ये पुणे, मुंबई आणि नाशिक येथील सर्वजण आहेत, अशी माहिती सॅटर्डे संडे ग्रुपच्या अध्यक्ष तृप्तीदा काटकर यांनी दिली.

Gavkari Admin

Recent Posts

लिव्ह इन रिलेशनशिप विवाहसंस्थेला पर्याय ठरू शकत नाही

लग्न न करता एकत्र राहण्याचे (लिव्ह इन रिलेशनशिप) फॅड अलीकडे खूप वाढले आहे. विशेषतः शहरात…

10 minutes ago

अखेरच्या सोमवारी शिवभक्तांची गर्दी

नाशिक ः काल शेवटच्या श्रावणी सोमवारी रिमझिम पावसातदेखील जवळपास लाखभर शिवभक्तांनी श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी…

22 minutes ago

विंचूर-गोंदेगाव रस्ताकामाला अखेर मुहूर्त!

रहिवाशांमध्ये समाधान; नववसाहतींच्या विकासाला मिळाली नवी दिशा विंचूर : प्रतिनिधी विंचूरच्या मध्यवर्ती तीन पाटीपासून हाकेच्या…

34 minutes ago

मेळघाटातील महिलांना उद्योजकतेचे धडे; पारंपरिक कलाकुसरीला नवे कोंद

नाशिक ः देवयानी सोनार आदिवासी समाजातील पेहराव, दागिने, दागिन्यांचे नक्षीकाम लोप पावत चालले आहे. नवीन…

46 minutes ago

मनपाची प्रभागरचना शुक्रवारी प्रसिद्ध होणार

हरकतींवरील सूचनांसाठीच्या कालावधीत मुदतवाढ नाशिक : प्रतिनिधी गेल्या अडीच महिन्यांपासून नाशिक महापालिका प्रशासनाकडून प्रभागरचना तयार…

52 minutes ago

सिन्नर गोंदेश्वराला फुलांची सजावट

सिन्नर ः चौथ्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून शहरासह तालुक्यातील भाविकांनी पुरातन गोंदेश्वराच्या चरणी माथा टेकवून…

2 hours ago