नाशिक : प्रतिनिधी
सार्वजनिक वाचनालय नाशिकच्या निवडणुकीला वादाचे ग्रहण लागले आहे. मतमोजणीच्या सलग दुसर्या दिवशीही वाद झाला आहे. कार्यकारी मंडळ सदस्यांच्या मतमोजणी दरम्यान ही घटना घडली आहे.
दुसऱ्या फेरीतील मतमोजणीमध्ये ग्रंथालय भूषण पॅनलच्या उमेदवार प्रेरणा बेळे यांच्या प्रतिनिधींनी मतमोजणी सुरू असताना दुसऱ्या मतपत्रिका बघून मोजणी होत असल्याचे लक्षात आणून दिले. परिणामी तणाव निर्माण झाला होता.मात्र त्याचदरम्यान उपस्थित साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी योगिनी जोशी आणि पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे वाद टळला.