पुणे : प्रतिनिधी
राज्यातील शाळा येत्या 16 जूनपासून सुरू होणार आहे. अशातच शाळांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, आता शाळा सकाळी सातऐवजी नऊ वाजता भरणार आहेत.
महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळांबाबत महत्त्वााचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळा सकाळी 7 ऐवजी 9 वाजता भरतील आणि दुपारी 4 वाजता सुटतील. म्हणजेच सकाळी 9 ते दुपारी 4 ही शाळेची वेळ असणार आहे. शाळांच्या नव्या वेळापत्रकानुसार, सकाळी 9 वाजल्यापासून ते 9.25 पर्यंत परिपाठ राहील. 9.25 ते 11.24 पर्यंत सुरुवातीचे तीन तास होतील. 11.25 पासून ते 11.35 पर्यंत 10 मिनिटांची छोटी सुट्टी असेल. 11.35 ते 12.50 पर्यंत दोन तास होतील. 12.50 ते 1.30 वाजेपर्यंत मधली सुट्टी होईल. त्यानंतर 1.30 ते 3.55 वाजेपर्यंत उर्वरित तास होतील. त्यानंतर शेवटच्या 5 मिनिटांमध्ये वंदे मारतम होईल आणि शाळा सुटतील.
महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा 16 जूनपासून सुरू होणार आहे. तर सीबीएसई बोर्डाची शाळा 9 जूनपासून सुरू झाल्या आहेत. राज्यातील 11 जिल्हे वगळता सगळीकडे शाळा 16 जूनपासून सुरू होणार आहेत. विदर्भामध्ये इतर विभागांच्या तुलनेत थोड्या उशिराने शाळा सुरू केल्या जातात.
नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार नाशिक : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या नाशिक महानगर जिल्ह्याची सन…
मंत्रिमंडळाचा निर्णय; दुकानदारांमध्ये नाराजी नाशिक : प्रतिनिधी राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या…
नगरविकासकडून निवडणूक आयोगाला प्रस्ताव सादर नाशिक : प्रतिनिधी शहरात होणार्या महापालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची संख्या…
अफवांची गावभर चर्चा; ग्रामीण भागात नागरिकांचा जागता पहारा निफाड : तालुका प्रतिनिधी गेल्या काही दशकापासून…
मुख्याधिकारी कदम यांची धाडसी कारवाई सिन्नर : प्रतिनिधी अतिक्रमणे काढण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने आठवडाभर अगोदर नोटिसा…
गुजरातच्या व्यक्तीने त्यावेळी संपर्क केल्याची माजी आमदार चव्हाण यांची माहिती सटाणा ः प्रतिनिधी ईव्हीएम मॅनेज…