नाशिक

मराठा समाजाच्या एसईबीसी आरक्षणाला स्थगिती नाही

मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकाराने मराठा समाजाला एसईबीसी कायद्यांंतर्गत 10 टक्के आरक्षण दिले होते. हे आरक्षण सरकारी नोकर्‍या आणि शिक्षणात देण्यात आले होते. मात्र, या आरक्षणाच्या विरोधात हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या. मुंबई हायकोर्टात यावर बुधवारी (दि. 11) सुनावणी होऊन मराठा समजाच्या एसईबीसी आरक्षणाला स्थगिती देण्यात आली नाही. त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांना एसईबीसी अ‍ॅडमिशनचा मार्ग मोकळा झाला आहे.
सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाला मे महिन्यात मराठा आरक्षणावरील सर्व याचिकांवर सुनावणी घेण्याचे निर्देश दिले होते. आरक्षणाच्या विरोधातील याचिकांमुळे उच्च शिक्षणातील मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आरक्षण देण्यात अडचण येत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या वैधतेबाबतची नव्याने सुनावणी आजपासून मुंबई हायकोर्टात सुरू झाली. हायकोर्टाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या नेतृत्वाखालील विशेष त्रिसदस्यीय पूर्णपीठ सुनावणी घेत आहे. सुरुवातीला प्रकरण अंतरिम दिलाशासाठी घ्यायचं की फायनल ऑर्डरसाठी यावर वकील आणि न्यायमूर्ती यांच्यात युक्तिवाद सुरू झाला. यावेळी विरोधी वकिलांनी जोपर्यंत तारीख होत नाही तोपर्यंत स्टे द्यावा, असा युक्तिवाद केला. यानंतर फायनल सुनावणीसाठी प्रकरण घेण्यात यावे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. यानंतर न्यायाधीश घुगे यांनी 19 जुलैला पूर्ण दिवस सुनावणी होईल, असे सांगितले.

लेखी युक्तिवाद सादर करण्याचे निर्देश

19 जुलैला दिवसभर सुनावणी सुरू राहील. त्यानंतर पुढची तारीख निश्चित केली जाईल. सर्व याचिकाकर्त्यांना 10 जुलैपर्यंत आपला लेखी युक्तिवाद उच्च न्यायालयात सादर करण्याचे
निर्देश न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती संदीप मारणे आणि न्यायमूर्ती निझामुद्दीन जमादार यांच्या पूर्णपीठाने बुधवारी झालेल्या आपल्या पहिल्या सुनावणीत दिले आहेत.

 

Editorial Team

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago