नाशिक

दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचे नुकतेच वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने शिल्पकलेतील छिन्नी आणि हातोडा पोरका झाला आहे. भारतातील नामवंत आणि जगविख्यात शिल्पकार म्हणून राम सुतार यांची ख्याती होती. गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा त्यांनी उभारला होता. नुकताच त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
राम सुतार यांनी दोनशेहून अधिक भव्य पुतळ्यांची उभारणी करून भारताच्या शिल्पकलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवून दिली. त्यांनी स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा दुप्पट उंच असणारा सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंचीचा भव्य पुतळा उभारला. शिल्पकलेत दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना 1999
मध्ये पद्मश्री आणि 2016 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
19 फेब्रुवारी 1925 रोजी महाराष्ट्रातील धुळ्यामधील गोंडूर या छोट्याशा गावी एका गरीब कुटुंबात राम सुतार यांचा जन्म झाला होता. त्यांनी मुंबईच्या ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’मध्ये शिक्षण पूर्ण केले. 1952 ते 58 या काळात तिशीतील राम सुतार यांनी आधी अजिंठा-वेरूळ येथील शिल्पांच्या डागडुजीचे आणि नंतर पंचवार्षिक योजनांचे लाभ सांगणारी लघुशिल्पे बनविण्याचे काम सरकारी नोकरीत राहून केले.
सुतार यांनी 1960 पासून त्यांचा स्वतंत्र स्टुडिओ उभारला.राम सुतार यांनी आतापर्यंत संसद भवनाच्या आवारातील मौलाना आझाद (18 फूट), इंदिरा गांधी (17 फूट), राजीव गांधी (12 फूट), गोविंदवल्लभ पंत (10 फूट) आणि जगजीवनराम (9 फूट) अशा अनेक मूर्ती घडवल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, इंदिरा गांधी, राजीव गांधी अशा अनेक दिग्गज नेत्यांच्या शिल्पांची निर्मिती त्यांनी केली आहे.
फ्रान्स, इटली, अर्जेंटिना, रशिया, इंग्लंड याठिकाणीही त्यांनी साकारलेली शिल्पं उभी आहेत. नेत्यांच्या जीवनातील प्रसंगांचे दर्शन घडविणारी भित्तिशिल्पे हेही सुतार यांचे एक वैशिष्ट्य होते.
अशा या ध्येयवेड्या ज्येष्ठ शिल्पकाराचे निधन मनाला चटका लावणारे आहे. त्यांना विनम्र श्रद्धांंजली!
– राजू जाधव

Sculptor Ram Sutar, who creates history from stone

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

17 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

17 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

17 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

17 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

17 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago