व्यवहारात, कामात, समाजात अशा अनेक ठिकाणी वापरला जाणारा शब्द म्हणजे अंदाज. अंदांज घेतले जातात, अंदाज बांधले जातात, अनुभवानुसार बरेच अंदाज बरोबरदेखील येतात, निघतात. तसेच अंदाज निसर्गाच्या बाबतीतदेखील बांधले जातात. काही तज्ज्ञ बरेच अंदाज सांगत असतात, काही हवामानतज्ज्ञ असतात तर काही भंपकपणे अंदाज मांडत असतात. एखादी परिस्थिती निर्माण झाली की मग जास्तच अंदाज बांधले जातात. अगदी पारावरच्या चर्चेत जो तो आपापले अंदाज वर्तवत असतो.
याही वर्षी पाऊस काही लवकर येत नव्हता, मग काय अनेक लोकांनी अनेक अंदाज घेतले. आणि समाजासमोर मांडले. कोणी येणार्या फळांचे उदाहरण देऊन दिले तर कोणी तापमानाचा दाखला घेऊन अंदाज वर्तविले. पण तो निसर्ग आहे, तो कुणाचाच नाही, त्या निसर्गाचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही कुठे किती पाऊस पडणार? कुठे ढगफुटी होणार? हे कोणीच सांगू शकत नाही. अलीकडे तर राजकारण करणारेसुद्धा हवामान अंदाज देत आहेत.
निसर्गाचा अंदाज फक्त आणि फक्त निसर्गच देऊ शकतो. निसर्गातील मुक्या प्राण्यांचे संकेत, पावश्या पक्ष्याचे ओरडणे, मुंग्यांची रांग लागणे, सापांची वीण सुरू होणे, वाळवीने वारूळ बंद करण्यास सुरुवात करणे, हे निसर्गाने दिलेले संकेत असतात, त्यावरून पावसाचे अंदाज असतात, निसर्ग हा स्वतंत्र आहे. त्याच्यावर कुणाचेच बंधन नाही. निसर्गाचे संरक्षण करण्यास निसर्ग सक्षम आहे. त्याचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही आणि त्याचा अंदाज कधी कोणाला लागणार पण नाही. ही जीवसृष्टी चालविण्याचे काम निसर्ग करतो आहे.
निसर्गात एक ऋतुचक्र सुरू आहे, त्या चक्रानुसार निसर्गात त्या त्या वेळेस ते ते बदल होत असतात. निसर्गाच्या नियमाप्रमाणे निसर्ग कार्य सुरू ठेवतो. त्याचे अंदाज कोणी बांधू शकत नाही. अलीकडेच ढगफुटीचा अंदाज जेव्हा वर्तविला गेला तेव्हा काही लोक आधीच भयभीत झाले होते. पण निसर्गाने लोकांनी बांधलेला अंदाज चुकविला. त्याने त्याच्याच नियमाप्रमाणे केले.
शेवटी तो निसर्गच, लोकांनी कितीही नद्या बुजविल्या, नाले बंद केले, खळया बुजवून शेती केली तरी तो निसर्ग त्याच्या नियमाप्रमाणे पुन्हा नद्यांच्या नद्या निर्माण करतो, नाल्यांचे नाले तयार करत असतो.
निसर्ग मानवाला नेहमी एकच संदेश देत असतो, निसर्ग नियमांचे काटेकोर पालन करणे, मात्र मानव निसर्गावर मात करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो, दरवेळी निसर्ग हाणूनच पाडतो. तसाच मानवाने वर्तविलेला निसर्गाचा अंदाज देखील निसर्ग चुकवितो, निसर्गाचा अंदाज कधीच कुणालाच लागू शकत नाही.
Searching for the self in silence
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…